औरंगाबादची लोकसभा जागा लढवण्यासाठी 'एमआयएम' इच्छुक
औरंगाबादमध्ये आमदार इमतियाज जलील यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत माजी न्यायमूर्ती बी. जी कोळसे-पाटील यांच्या उमेदवारीला कार्यकर्त्यांनी विरोध केला आणि एमआयएमने स्वतः निवडणूक लढवावी अशी इच्छा व्यक्त केली.
औरंगाबाद- राज्यात बहुजन वंचित आघाडी निवडणूक लढवणार असून अनेक ठिकाणी उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. औरंगाबादमधून माजी न्यायमूर्ती बी. जी कोळसे-पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, या उमेदवारीला एमआयएमने अप्रत्यक्ष विरोध करत औरंगाबादेतून स्वतः लोकसभा लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.