अमरावती -युवास्वाभिमान पार्टीच्या वतीने बुधवारी अमरावतीच्या राजकमल चौकात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी विदर्भात यावे. तसेच शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी यावेळी युवास्वाभिमानच्या वतीने करण्यात आली.
अतिवृष्टीचा फटका : युवास्वाभिमानच्यावतीने अमरावतीत मुख्यमंत्र्यांविरोधात आंदोलन - युवास्वाभिमान पार्टी
युवास्वाभिमान पार्टीच्या वतीने बुधवारी अमरावतीच्या राजकमल चौकात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी विदर्भात यावे. तसेच शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी यावेळी युवास्वाभिमानच्या वतीने करण्यात आली.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या काही दिवसांपासून मुख्यमंत्र्यांवर सातत्याने टीका करत आहेत. यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांकडून नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्या पोस्टरला मंगळवारी जोडेमारो आंदोलन करण्यात आले. शिवसैनिकांच्या या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून बुधवारी युवास्वाभिमानच्या शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र येत मुख्यमंत्र्यांविरोधात आंदोलन केले.
यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी संकटात सापडला आहे. पिकांना परतीच्या पावसाचा फटका बसला आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळायला हवी. असे असताना मुख्यमंत्री मात्र मातोश्री सोडायला तयार नसल्याची टीका यावेळी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली.