अमरावती - रस्त्याचे काम सुरू असल्याचे कारण सांगत राजपेठ बसस्थानक गेल्या २ महिन्यांपासून बंद आहे. विशेष म्हणजे या मार्गावरून मध्यवर्ती बस स्थानकावर गाड्या ये-जा करीत आहेत. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बस स्थानक त्वरित सुरू झाले नाही, तर बसस्थानकाला कायमस्वरुपी कुलूप ठोकण्याचा इशारा युवासेनेने दिला आहे.
अमरावतीतील राजपेठ बसस्थानक २ महिन्यांपासून बंद, युवासेनेकडून कायमस्वरूपी कुलूप ठोकण्याचा इशारा - युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख राहुल माटोडे
अमरावतीतील राजपेठ बसस्थानक कधी सुरू असते, तर कधी अचानक बंद केले जाते. या प्रकारामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. त्यासाठी युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख राहुल माटोडे यांनी महाराष्ट्र परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक श्रीकांत गबने यांना निवेदन सादर केले.
राजपेठ बसस्थानक कधी सुरू असते, तर कधी अचानक बंद केले जाते. या प्रकारामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. त्यासाठी आज युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख राहुल माटोडे यांनी महाराष्ट्र परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक श्रीकांत गबने यांना निवेदन सादर केले. राजपेठ बस स्थानकाचे नेमके काय नाटक सुरू आहे? अशा शब्दात जाब विचारला. कोणतीही पूर्व सूचना न देता बस स्थानक बंद केले जाते. अनेक प्रवासी दूरवरून येऊन मध्यवर्ती बस स्थानकावर जातात. त्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतो आहे. सध्या राजपेठ परिसरात रस्त्याचे काम सुरू नाही. अकोल्यावरून येणाऱ्या गाड्या राजपेठ बस स्थानकासमोर थांबतात. त्या बसस्थानकामध्ये जाऊ शकतात. मात्र, प्रवाशांना विनाकारण त्रास देणे सुरू आहे. गेल्या २ दिवसात राजपेठ बस स्थानक सुरू झाले नाही, तर आम्ही बस स्थानकाला कायमस्वरूपी कुलुप ठोकू, असा इशारा राहुल माटोडे यांनी दिला.