अमरावती -अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ असमर्थ ठरत असून, सलग पाचव्यांदा परीक्षा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठात गोधंळ घातला. यावेळी कुलगुरूंच्या दालनाची तोडफोड करत, कुलगुरूंची खुर्ची देखील फेकून देण्यात आली.
युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून कुलगुरूंच्या दालनात तोडफोड - ऑनलाइन परीक्षा
अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ असमर्थ ठरत असून, सलग पाचव्यांदा परीक्षा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठात गोंधळ घातला. यावेळी कुलगुरूंच्या दालनाची तोडफोड करत, कुलगुरूंची खुर्ची देखील फेकून देण्यात आली.
कोरोनामुळे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा घेण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. दरम्यान संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे कंत्राट प्रोमार्क नावाच्या कंपनीला दिले होते. मात्र ऑनलाईन परीक्षा घेण्यास या कंपनीकडे व्यवस्थाच नसल्याने विद्यपीठाची 20 ऑक्टोबरला सुरू झालेली परीक्षा ऐनवेळी रद्द करावी लागली होती. परीक्षा आतापर्यंत तब्बल पाचवेळा रद्द करण्याची नामुष्की विद्यापीठावर ओढावली आहे.
याच विषयावर चर्चा करण्यासाठी युवासेनेचे कार्यकर्ते आज विद्यापीठामध्ये गेले होते. मात्र कुलगुरू एका बैठकीत असल्याने त्यांची वाट पहावी लागली.तास भर बसूनही कुलगुरू भेटायला आले नसल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी सभागृहात तोडफोड केली. यावेळी कुलगुरूंच्या विरोधात घोषणाही देण्यात आल्या. यावेळी युवासेना शहर प्रमुख मयुर गव्हाणे,
शिवराय चौधरी, युवासेना तालुका प्रमुख विपीन डोंगे, मनोज टेकाडे, पंकज मानकर यांच्यासह युनासेना कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.