महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावती : इंधन दर वाढीविरोधात युवक काँग्रेसचे 'घोडेस्वारी' आंदोलन - petrol diesel price agatation amarvati

राजकमल चौक येथून युवक काँग्रेसचे कार्यकर्ते घोड्यावर बसून निघाले. यावेळी अनेक कार्यकर्ते हे सायकल घेऊनही आंदोलनात सहभागी झाले. राजकमल चौक येथे आंदोलकांनी घोषणा दिल्या असता या चौकात काही वेळ वाहतूक व्यवस्थेची तारांबळ उडाली.

yuvak congress agitation over petrol diesel hike
युवक काँग्रेसचे 'घोडेस्वारी' आंदोलन

By

Published : Mar 8, 2021, 3:50 PM IST

Updated : Mar 8, 2021, 4:53 PM IST

अमरावती -इंधन दरवाढीविरोधात युवक कॉंग्रेसच्यावतीने शहरात सोमवारी घोडेस्वारी आंदोलन करून केंद्र शासनाचा निषेध नोंदविण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेची फसवणूक केल्याचा आरोप यावेळी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आला. तर या आगळ्या वेगळ्या आंदोलनाद्वारे युवक काँग्रेसने उपस्थितांचे लक्ष वेधले.

युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सागर देशमुख याबाबत बोलताना.

महापालिकेसमोर घोषणाबाजी -

भाजपची सत्ता असणाऱ्या अमरावती महापालिकेसमोर युवक काँग्रेस कार्यकर्ते घोड्यावर बसून पोहोचले. मात्र, यावेळी सुरक्षा रक्षकांनी महापालिकेचे मुख्य प्रवेशद्वार लावून घेतले. यावेळी आंदोलनकर्त्या एका युवकाने सिलेंडर उचलून सुरक्षा रक्षकांच्या अंगावर फेकण्याची धमकी देताच खळबळ उडाली. यावेळी युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

हेही वाचा -दुचाकी अन् सिलेंडरला फासावर लटकवत श्राद्ध घालून दरवाढी विरोधात अनोखे आंदोलन

या मार्गाने निघाले घोडेस्वार आंदोलक -

राजकमल चौक येथून युवक काँग्रेसचे कार्यकर्ते घोड्यावर बसून निघाले. यावेळी अनेक कार्यकर्ते हे सायकल घेऊनही आंदोलनात सहभागी झाले. राजकमल चौक येथे आंदोलकांनी घोषणा दिल्या असता या चौकात काही वेळ वाहतूक व्यवस्थेची तारांबळ उडाली. राजकमल चौक, जयस्तंभ चौक मार्गाने आंदोलक इर्विन चौकात धडकले.

हेही वाचा -आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल प्रति बॅरल ७० डॉलर; देशात इंधनाचे दर 'जैसे थे'

पेट्रोल पंपावर घोषणाबाजी -

इर्विन चौक येथील पेट्रोल पंपावर युवक कॉंग्रेस कार्यकर्ते घोड्यावर आणि सायकलवरवर पोहोचले. यावेळी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला आलेल्या नागरिकांना पेट्रोल आणि गॅस सिलिंडरची दरवाढ करून केंद्र शासनाने सर्वसमन्यांवर मोठा अन्याय केला आहे. जागे व्हा, आंदोलनात सहभागी व्हा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

यांचा होता आंदोलनात सहभागी -

या आगळ्यावेगळ्या आंदोलनात सागर देशमुख, संजय मापले, सागर कलाने, पंकज मोरे, गुड्डू हमीद, मुकेश ललवाणी, वैभव मोहोड, आशिष यादव आदी कार्यकर्ते सहभागी होते.

Last Updated : Mar 8, 2021, 4:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details