अमरावती -राज्यसभा निवडणुकीत भाजपचे डॉ. अनिल बोंडे विजयी ( Anil Bonde Won Rajyasabha Election 2022 ) झाल्यामुळे अमरावतीत खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) आणि आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana ) यांच्या युवा स्वाभिमान पार्टीच्या ( Yuva Swabhiman Party Celebrate Anil Boonde Victory ) कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला.
राणा दांपत्य आणि डॉ. अनिल बोंडे यांच्यात घनिष्ठ संबंध -अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांचे डॉ. अनिल बोंडे यांच्यासोबत कनिष्ठ संबंध आहेत. डॉ. अनिल बोंडे हे राज्याचे कृषिमंत्री झाले असताना त्यांच्या पहिल्याच अमरावती दौऱ्यादरम्यान त्यांचे अमरावतीत पहिले स्वागत आणि सत्कार आमदार रवि राणा यांच्या शंकरनगर स्थित निवासस्थानीच झाले होते. आज डॉ. अनिल बोंडे यांची राज्यसभेवर निवड झाली असताना राणा समर्थकांनी आनंद व्यक्त केला.
रविवारी डॉ. अनिल बोंडे यांचा स्वागत सोहळा -खासदार म्हणून डॉ. अनिल बोंडे रविवारी सायंकाळी 5 वाजता मुंबईतून नागपूर मार्गे अमरावतीला येणार आहेत. अमरावती शहरात येण्यापूर्वी तिवसा आणि मोझरी येथे त्यांचा स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला आहे. अमरावती शहरात पंचवटी चौक येथे भाजपच्या अमरावती जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांच्या हस्ते खासदार डॉ. अनिल बोंडे यांचे स्वागत केले जाणार आहे. पंचवटी चौक येथील शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला खासदार डॉ. अनिल बोंडे अभिवादन करतील. त्यानंतर इरविन चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला खासदार डॉ. अनिल बोंडे अभिवादन करणार असून जयस्तंभ चौक येथील महात्मा गांधींच्या पुतळ्याला तसेच चित्रा चौक येथील महात्मा फुलेंच्या पुतळ्याला खासदार डॉ. अनिल बोंडे अभिवादन करणार आहेत. सायंकाळी साडेसात वाजता अंबा देवी मंदिरात डॉ. अनिल बोंडे अंबा देवीचे दर्शन करणार असून राजकमल चौक येथे त्यांचे भव्य स्वागत केले जाणार आहे.
हेही वाचा -Tadoba Andhari Tiger Project : ताडोबातील 90 टक्के रोप जिवंत असल्याचा प्रशासनाचा दावा; मात्र प्रत्यक्षात स्थिती वेगळीच