अमरावती - जिल्ह्यातील खल्लार या गावाजवळच्या चंद्रपूर गावामध्ये दोन युवकांमध्ये वाद झाला. त्यातील एका युवकाने दुसऱ्यावर चाकूने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. घटना घडताच घटनास्थळी गर्दी जमत असल्यामुळे आरोपी युवक घटनास्थळावरून पसार झाला. या हल्ल्यात युवकाला जबर दुखापत झाली असून प्रथमोपचार प्राथमिक आरोग्य केंद्र चंद्रपूर येथे करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचाराकरता जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे पाठविण्यात आले. मिथुन दीपक सुखदेवे (वय 26 वर्षे, चंद्रपूर) असे जखमी युवकाचे नाव असून विशाल घरडे (वय 22 वर्षे, चंद्रपूर) असे चाकू हल्ला करणाऱ्या युवकाचे नाव आहे.
अमरावतीच्या चंद्रपूर गावात युवकांचा वाद, चाकू हल्ल्यात एक जखमी - अमरावती चाकू हल्ला तरुण जखमी बातमी
चंद्रपूर जवळील रोडावर विशाल घरडे याने मिथुन सुखदेवे याला पाठीमागून येऊन चाकूने वार करून हल्ला चढविला. या हल्ल्यात मिथुन सुखदेवे याला एक पोटात तर दुसरा घाव मांडीत लागला. या हल्ल्यात जवळच उभा असलेल्या युवकाने मध्यस्थी केली असता त्या युवकाच्या हातालाही चाकू लागला.
या घटनेची सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, की बुधवारी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास खल्लार स्टॉप येथे पैशाच्या कारणावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला होता. मिथुन सुखदेवे हा खल्लार स्टॉपवरुन घरी परतला होता. परंतु, अवघ्या एक तासाच्या आत विशाल घरडे ही गावात आला. दोन्ही युवक गावात आल्यानंतर ग्रामपंचायत चंद्रपूर जवळील रोडावर विशाल घरडे याने मिथुन सुखदेवे याला पाठीमागून येऊन चाकूने वार करून हल्ला चढविला. या हल्ल्यात मिथुन सुखदेवे याला एक पोटात तर दुसरा घाव मांडीत लागला. या हल्ल्यात जवळच उभा असलेल्या युवकाने मध्यस्थी केली असता त्या युवकाच्या हातालाही चाकू लागला. घटनास्थळी गर्दी जमली असता विशाल घरडे हा घटनास्थळावरून पसार झाला. जखमी मिथुनवर प्राथमिक आरोग्य केंद्र चंद्रपूर येथे डॉ. विक्रांत कुळमेथे यांनी प्रथमोपचार केला.
जखमीची परिस्थिती चिंताजनक असल्यामुळे पुढील उपचाराकरता जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे पाठवण्यात आले. घटनेची माहिती खल्लार पोलिसांना मिळताच पीएसआय आशिष गंद्रे, पोकॉ अविनाश ठाकरे, पोहेकॉ अनील बेलसरे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र चंद्रपूर येथे धाव घेऊन जखमी युवकाचा बयाण नोंदविला असून पसार झालेल्या आरोपींचा शोध खल्लार पोलीस घेत आहे.