अमरावती- शांततेचा मार्ग दाखविणारे भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज १५० वी जयंती आहे. त्यानिमित्ताने जिल्ह्यातील परतवाडा येथील अनूज कान्हेरकर या तरुणाने महात्मा गांधी यांची २५ फुटाची भव्यदिव्य प्रतिमा असणारी रांगोळी साकारली आहे. या रांगोळीला पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली आहे.
अमरावतीच्या परतवाडा शहरात तरुणाने साकारली २५ फुटाची महात्मा गांधींची रांगोळी - Anuj Kanhekar Mahatma Gandhi Rangoli
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज १५० वी जयंती आहे. त्यानिमित्ताने जिल्ह्यातील परतवाडा येथील अनूज कान्हेरकर या तरुणाने संपूर्ण जगाला शांततेचा मार्ग दाखविणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची २५ फूटाची भव्यदिव्य प्रतिमा असणारी रांगोळी साकारली आहे.
देशात सर्वधर्म समभाव नांदविण्याकरता महात्मा गांधीजींनी मोलाचे कार्य केले. त्यांचे संदेश देणारे हे बोलके रांगोळी चित्र सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर या रांगोळीचे फोटो सर्वत्र पसरविण्यात आले. त्याद्वारे सर्वांनी शांतीचा मार्ग अवलंबविला पाहिजे असा मोलाचा संदेश या रांगोळीच्या माध्यमातून अनूजने नागरिकांना दिले. महात्मा गांधी यांची भव्यदिव्य रांगोळी काढल्याबद्दल अनूजचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हेही वाचा-अमरावतीत उमेदवार नेमका कोणाचा; काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पेच