महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Accident : युवक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वाहनाला ट्रकची धडक; लोकसभा महासचिव रोहित देशमुख ठार - अपघातात मृत्यू

अमरावती युवक काँग्रेसचे लोकसभा महासचिव रोहित देशमुख यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. अकोला येथील युवक काँग्रेसचा कार्यक्रम अटोपून अमरावतीला परत येताना दर्यापूर जवळ त्यांच्या कारला ट्रकने धडक दिली. शनिवारी मध्यरात्रीच्या दरम्यान झालेल्या या अपघातात रोहित यांचा जागेवरच मृत्यू झाला तर त्यांच्यासोबत असलेले पाच जण जखमी आहेत. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचे समर्थक मानले जाणाऱ्या रोहित यांच्या अपघाती निधनाने जिल्हा काँग्रेसवर शोककळा पसरली आहे. रोहित देशमुख यांच्या पार्थिवावर रविवारी सायंकाळी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Rohit Ajay Deshmukh died in an accident
युवक काँग्रेसचे अमरावती लोकसभा महासचिव रोहित अजय देशमुख यांचा अपघातात मृत्यू

By

Published : Mar 13, 2022, 8:05 AM IST

Updated : Mar 13, 2022, 8:48 AM IST

अमरावती- अकोला येथे आयोजित युवक काँग्रेसचा कार्यक्रम आटपून अमरावतीला परत येणाऱ्या युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वाहनाला दर्यापूर जवळ आराळा येथे ट्रकने धडक दिली. शनिवारी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात युवक काँग्रेस अमरावती लोकसभा महासचिव रोहित अजय देशमुख (27) हे जागीच ठार झाले. या घटनेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांवर शोककळा पसरली आहे.

युवक काँग्रेसचे अमरावती लोकसभा महासचिव रोहित अजय देशमुख यांचा अपघातात मृत्यू
पाच जण जखमी


या अपघातात रोहित देशमुख यांच्यासोबत कारमध्ये असणारे युवक काँग्रेसचे अमरावती विधानसभा अध्यक्ष वैभव देशमुख, चांदुर रेल्वेचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांचा मुलगा परीक्षित जगताप, युवक काँग्रेसचे मेळघाट विधानसभा अध्यक्ष पंकज मोरे आणि वाहनचालक व सनी नावाचा युवक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जिल्हा काँग्रेसवर शोककळा


या अपघातात दगवलेला रोहित देशमुख हा माजी खासदार के.जी. देशमुख यांचा नातू असून जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा समर्थक होता. रोहितचे वडील अजय देशमुख हे टाकरखेडा सभुचे माजी सरपंच होते. रोहित देशमुख यांच्या पार्थिवावर आज (रविवारी) सायंकाळी अंत्यसंस्कार होणार आहेत. सायंकाळी 5 वाजता रोहित देशमुख यांच्या रुख्मिणी नगर येथील निवासस्थानावरून अंत्ययात्रा निघणार आहे. रोहितच्या मृत्यूमुळे देशमुख कुटुंबियांसह शहर आणि जिल्हा काँग्रेसवर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा : रानडुकरांचा कळप आडवा आल्याने तीन वाहनांचा अपघात; दोघांचा मृत्यू, तीन गंभीर जखमी

Last Updated : Mar 13, 2022, 8:48 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details