महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Youngster Climbed on Tower Amravati : रेतीची होणारी तस्करी थांबावा; मागणीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयातील टॉवरवर चढला युवक

अमरावती पोलीस अधीक्षक कार्यालय ( Amravati Sp Office ) परिसरात असणाऱ्या मोबाईल टॉवरवर एक युवक चढल्यामुळे खळबळ उडाली. ( Youngster Climbed on Tower ) या युवकाने टॉवरवर चढताना बॅग सोबत घेतली आहे.

Youngster on Tower in SP Office
पोलीस अधीक्षक कार्यालयातील टॉवरवर चढला युवक

By

Published : Feb 28, 2022, 3:58 PM IST

Updated : Feb 28, 2022, 4:11 PM IST

अमरावती -अमरावती पोलीस अधीक्षक कार्यालय ( Amravati Sp Office ) परिसरात असणाऱ्या मोबाईल टॉवरवर एक युवक चढल्यामुळे खळबळ उडाली. ( Youngster Climbed on Tower ) या युवकाने टॉवरवर चढताना बॅग सोबत घेतली आहे. यातील दोरी काढून त्याने ही दोरी गळ्यात अडकवली आहे.

घटनास्थळाची दृश्य

युवकाची मागणी -

हा युवक जिल्ह्यातील मंगरूळ दस्तगीर येथील रहिवासी असून त्याचे नाव अतुल भूजाडणे असे आहे. जिल्ह्यात रेतीची होणारी तस्करी थांबावी अशी मागणी या युवकाची आहे. सध्या शाळा सुरू झाल्यामुळे रस्ताने भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकमुळे ऑटोरिक्षा, स्कूल व्हॅन आणि सायकलने जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. यामुळे रेतीची वाहतूक वाहतूक रात्री आणि पहाटेच व्हावी, अशी मागणीही अतुल भुजाडणे या युवकाने केली आहे.

युवकाला टॉवर खाली उतरण्याची विनवणी -

टॉवरवर चढलेला युवकाने खाली उतरावे अशी विनवणी पोलीस प्रशासनाच्या वतीने केली जात आहे. या युवकाला टॉवर खाली उतरण्यासाठी महापालिकेचे अग्निशमन दलही पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात दाखल झाले आहे. या युवकाने आपल्या जीवाचे बरे वाईट करू नये, यासाठी पोलिसांच्या वतीने खबरदारी बाळगली जात आहे.

हेही वाचा -Ravi Rana on Yashomati Thakur : माझ्या विरोधात षडयंत्र रचणाऱ्यांचे हिशोब चुकते होणार - रवी राणा

युवक भ्रमणध्वनीद्वारे साधतो आहे संवाद -

टॉवरवर चढलेला अतुल भुजाडणे हा युवक त्याने सोबत नेलेल्या भ्रमणध्वनीद्वारे पोलिसांसोबत तसेच त्याच्या संबंधित व्यक्तींसोबत सातत्याने संवाद साधत आहे. मी खाली उतरल्यावर माझ्यावर कुठल्याही स्वरुपाची कारवाई करण्यात येऊ नये, असेसुद्धा हा युवक म्हणत आहे.

Last Updated : Feb 28, 2022, 4:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details