अमरावती -मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणांमधील जलसाठा वाढला आहे. भरलेले शहानूर धरण बघण्यासाठी गेलेला एक तरुण धरणात बुडाल्याची घटना समोर आली आहे. आदित्य शांताराम काळबागे, असे या तरुणाचे नाव आहे. तरुणाचा अद्यापही शोध लागला नसून बचाव पथकाकडून त्याचा शोध सुरू आहे.
अमरावतीच्या शहानूर धरणात तरुण बुडाला, बचाव पथकाद्वारे शोध सुरू - शोध
पावसाचा आनंद घेण्यासाठी दर्यापूर येथील पाच तरुण शहानूर धरण पाहण्यासाठी गेले होते. यावेळी त्यातील आदित्य काळबागे हा तरुण मासोळी पकडण्यासाठी गेला असता, त्याचा तोल जाऊन तो धरणात बुडाल्याची घटना समोर आली आहे. आदित्यचा अद्यापही शोध लागला नसून बचाव पथकाकडून त्याचा शोध सुरू आहे.
आदित्य शांताराम काळबागे
जिल्ह्यात संततधार पाऊस आहे. यामुळे पावसाचा आनंद घेण्यासाठी दर्यापूर येथील पाच तरुण शहानूर धरण पाहण्यासाठी गेले होते. यावेळी त्यातील आदित्य काळबागे हा तरुण मासोळी पकडण्यासाठी गेला असता, त्याचा तोल जाऊन तो धरणात बुडाल्याची घटना समोर आली आहे.