अमरावती- जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे जानेवारी महिन्यात एका विद्यार्थिनीची तिच्या प्रियकराने हत्या केली होती. याप्रकरणी मुलीच्या आईने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करुन दत्तापूरचा ठाणेदार रवींद्र सोनवणे यांनी या प्रकरणात लक्ष न दिल्याचे आरोप केले होते. त्यानुसार रवींद्र सोनवणे यांना बडतर्फ करण्यात आले आहे.
तरुणीची हत्या प्रकरणी अखेर 'तो' ठाणेदार बडतर्फ, पोलीस महासंचालकांनी दिले आदेश - अमरावती तरुणीची हत्या
विद्यार्थिनीच्या हत्या प्रकारणात दत्तापूर येथील ठाणेदाराने लक्ष दिले नाही. या प्रकरणी कारवाई करत ठाणेदाराला अटक करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने 17 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत सुनावली होती. मात्र, अमरावती जिल्हा पोलीस अधीक्षक हरिबालाजी यांनी ठाणेदाराला पोलीस खात्यातून बडतर्फ करण्याचा प्रस्ताव पाठवला होता.
हेही वाचा...महिला दिन विशेष : स्त्रीरोग तज्ज्ञ शांती राय यांच्या अतुलनीय कामगिरीचा आढावा
विद्यार्थिनीच्या हत्या प्रकारणात दत्तापूर येथील ठाणेदाराने लक्ष दिले नाही. या प्रकरणी कारवाई करत ठाणेदाराला अटक करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने 17 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत सुनावली होती. मात्र, अमरावती जिल्हा पोलीस अधीक्षक हरिबालाजी यांनी ठाणेदाराला पोलीस खात्यातून बडतर्फ करण्याचा प्रस्ताव पाठवला होता. आज पोलीस महासंचालकाने रवींद्र सोनवने यांना पोलीस खात्यातून बडतर्फ करण्याचा आदेश काढला. यामुळे पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकरणात रवींद्र सोनवने यांच्या असभ्य वर्तनामुळे जनमानसात पोलीस खात्याची प्रतिमा मालिन झाल्याने पोलीस खात्याने हा निर्णय घेतला अशी चर्चा केली जात आहे.