अमरावती - कुलरमध्ये पाणी भरताना एका तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ही घटना अमरावती जिल्ह्यातील जुना धामणगाव येथे आज सकाळच्या सुमारास घडली. उज्वल व्यवहारे असे मृत तरुणाचे नाव आहे.
कुलरमध्ये पाणी भरताना विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू - dhamangaon
कुलरमध्ये पाणी भरताना एका तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ही घटना अमरावती जिल्ह्यातील जुना धामणगाव येथे आज सकाळच्या सुमारास घडली. उज्वल व्यवहारे असे मृत तरुणाचे नाव आहे.
कुलरमध्ये पाणी भरताना विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू
उज्वल व्यवहारे आज सकाळी आपल्या घरातील कुलरमध्ये पाणी भरत होता. तेव्हा त्याला अचानक विद्युत प्रवाहाचा जोरदार धक्का बसला. यामुळे त्याला घरातील नातेवाईकांनी उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.