काळाबाजार करणाऱ्यांनो खबरदार; यशोमती ठाकूर यांचा इशारा
आजच्या या संकट काळात आपले देशावर किती प्रेम आहे तसेच समाजाप्रती आपली बांधीलकी हे सिद्ध करण्याची वेळ आहे. अशा या संकट काळात जर कोण्या व्यापाऱ्याने काळाबाजार केल्याचे आढळले, तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाणार, असे यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केले.
काळाबाजार करणाऱ्यांनो खबरदार; यशोमती ठाकूर यांचा इशारा
अमरावती - कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या कठीण परिस्थितीत जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या असून आता काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा आमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिला आहे.