महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

APMC Election Result : हनुमान चालीसा, चांदीची नाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत चालली नाही - यशोमती ठाकूर

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली आहे. या निवडणुकीत आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना मोठा धक्का बसला आहे. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती यशोमती ठाकूर यांनी आपल्या ताब्यात घेतली आहे

Apmc Election
कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक

By

Published : Apr 29, 2023, 3:38 PM IST

Updated : Apr 29, 2023, 3:55 PM IST

विजयावर प्रतिक्रिया देताना यशोमती ठाकूर

अमरावती:सहकार क्षेत्रात अतिशय महत्वपूर्ण समजल्या जाणारी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पार पडली आहे. अमरावती जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकी त महाविकास आघाडीचे सर्व अठराही उमेदवार विजयी झाले आहे. तर विरोधात असणाऱ्या आमदार रवी राणा यांच्या शेतकरी पॅनलचा पुरता धुवा उडाला आहे. या विजयावर प्रतिक्रिया देताना जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री आणि तिवसाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी हनुमान चालीसा आणि चांदीची नाणी या निवडणुकीत चालली नाही असे म्हटले आहे.




भाजपला शेतकऱ्यांचे हित कळत नाही: शेतकऱ्यांचे हित नेमके कशात आहे, याबाबत भाजपला काही एक कळत नसल्यामुळे राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचा सर्वत्र पराभव झाला आहे. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत आमच्या विरोधकांनी जागोजागी हनुमान चालीसाचे पठण केले, चांदीच्या नाण्यांचे वाटप केले, पैसाही वाटला मात्र शेतकऱ्यांनी त्यांचा दारुण पराभव केला. असे देखील आमदार यशोमती ठाकूर म्हणाला आहेत.



आमदार राणांच्या पॅनलचा दारुण पराभव: अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार रवी राणा यांचे शेतकरी पॅनल निवडणूक रिंगणात होते. आमदार रवी राणा यांचे सखे मोठे भाऊ सुनील राणा हे या निवडणुकीत उमेदवार असताना आमदार राणा यांच्या पॅनल मधील एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही.



महाविकास आघाडीचा जल्लोष:अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल स्पष्ट झाल्यावर महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ढोल ताशे आणि फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला. यावेळी शिवसेनेचे दिवंगत नेते आणि माजी आमदार संजय बंड यांचे छायाचित्र असणारे पोस्टर घेऊन शिवसैनिकांनी जल्लोष केला. आमदार यशोमती ठाकूर यांनी काँग्रेस आणि शिवसेनेचा झेंडा हातात धरून विजयाचा आनंद साजरा केला. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीतील सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते या जल्लोषात सहभागी होते.

हेही वाचा: APMC Election Result 2023 तिवसा कृषी उत्पन्न बाजार समितीवर यशोमती ठाकूर यांची एकहाती सत्ता १८ पैकी १८ जागा जिंकल्या

Last Updated : Apr 29, 2023, 3:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details