महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'यशोमती ठाकुरांनी राहुल गांधींसह सर्व काँग्रेस नेत्यांना गाईचे महत्व समजून सांगावे' - Shivarai Kulkarni reaction on cow

यशोमती ताई यांनी संस्कृती जपायला महत्त्व दिले आहे. आता यशोमती ताई ज्या काँग्रेसच्या गटामध्ये वावरतात त्यांना आता गाईचे महत्व समजून सांगायची गरज आहे, असे ही शिवराय कुलकर्णी म्हणाले.

amravati
यशोमती ठाकूर

By

Published : Jan 12, 2020, 6:36 PM IST

अमरावती- काँग्रेसच्या नेत्या व महिला बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर एका कार्यक्रमात बोलताना म्हणाल्या होत्या, की गाईचे दर्शन व तिच्या पाठीवर हात फिरवल्यास नकारात्मकता दूर होते. त्यांच्या या वक्तव्यावर टीका होत असतानाच भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी यशोमती ठाकूर यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. यशोमती ठाकूर यांनी राहुल गांधीसह सर्व काँग्रेस नेत्यांना गाईचे महत्त्व समजून सांगावे, असा खोचक सल्लाही शिवराय कुलकर्णी यांनी यशोमती ठाकूर यांना दिला आहे.

प्रतिक्रिया देताना शिवराय कुलकर्णी

यशोमती ठाकूर यांनी गाईला स्पर्श केल्याने नकारात्मकता दूर होते, असे विधान केले होते. त्यावर बोलताना भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी म्हणाले की, यशोमती ठाकूर यांच्या या वक्तव्याचे मी समर्थन करून त्यांचे अभिनंदन करतो. तसेच देशातल्या तमाम काँग्रेस जनांना विनंती करतो की, यशोमती ताईंनी जो विचार व्यक्त केला आहे त्याचे समर्थन केले पाहिजे. परंतु, दुर्दैवाने देशातली काँग्रेस ही कथित धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली गोमांस खाणाऱ्यांचे समर्थन करते. केंद्र सरकारच्या विविध राज्यातील भारतीय जनता पार्टीच्या सरकारवर काँग्रेसने जे काही तोंडसुख घेतल आहे ते सगळे बघता यशोमती ठाकूर यांच्या वक्तव्याचे मी स्वागत करतो. यशोमती ताई त्यांच्यावरचे तसे संस्कार आहे त्यामुळे त्या बोलल्या. त्यांनी संस्कृती जपायला महत्त्व दिल आहे. आता यशोमती ताई ज्या काँग्रेसच्या गटामध्ये वावरतात त्यांना आता गाईचे महत्व समजून सांगायची गरज आहे, असे ही शिवराय कुलकर्णी म्हणाले.

हेही वाचा-'पण.. मी खचणार नाही, मी तुकडोजी महाराजांच्या कर्मभूमीत जन्मलीय'

ABOUT THE AUTHOR

...view details