प्रतिक्रिया देताना आमदार यशोमती ठाकूर अमरावतीYashomati Thakur On Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय नेते तथा खासदार शरद पवार (Sharad Pawar) हे अमरावतीला पोहोचले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसंच इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट विश्राम भवनात घेतली. त्यांच्या भेटीमुळं कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय.
शरद पवार आणि बच्चू कडू यांची होणार भेट: शरद पवार हे दोन दिवस अमरावती दौऱ्यावर असून बच्चू कडू यांची भेट घेणार आहेत. या मुद्द्यावर आमदार यशोमती ठाकूर यांना प्रश्न विचारला असता, अशा भेटी होत असल्यास महाविकास आघाडीसाठी चांगलच असल्याचं त्यांनी सांगितलंय. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये येईल का? यावर वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांची विचारधारा एकच असल्याचं सांगून तसं झाल्यास नक्कीच फायदा होईल. जी मंडळी दंगा आणि भांडण करतात त्यांच्याविरुद्ध उभे राहण्याची गरज असल्याचं ठाकूर यांनी सांगितलंय.
देश टिकला पाहिजे: राहुल गांधींचा भारत यात्रेचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. त्यांच्या या यात्रेकडं आपण कसे बघता यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या की, राहुल गांधी (Rahul gandhi) हे प्रामाणिक आणि चांगले व्यक्ती आहेत. देश टिकला पाहिजे, देशाचे तुकडे होऊ नयेत, यासाठी ते प्रामाणिकपणे काम करतात.
खासदार शरद पवार यांचा होणार सन्मान : शरद पवार यांचे कृषी क्षेत्रात अमोल योगदान आहे. कृषीमंत्री असताना त्यांनी भरीव काम केलं आहे. तसंच त्यांचं कृषी क्षेत्रात विशेष योगदान आहे. त्यांच्या या विशेष योगदानाबद्दल श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती तर्फे डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती चिन्हे तसंच पाच लाख रुपये देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
हेही वाचा -
- 'ये गप रे, बस खाली', जितेंद्र आव्हाडांनी केली अजित पवारांची नक्कल
- अजित पवार यांच्या ‘त्या’ टीकेवर शरद पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले माझ्या वेळेस सर्वांनी विचार करून निर्णय घेतला
- शरद पवारांनी मानले गौतम अदानींचे आभार; नेमकं कारण काय?