महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Yashomati Thakur: शेतकऱ्यांना पाणी न मिळाल्यास अधिकाऱ्यांच्या घरापुढे आंदोलन करणार - यशोमती ठाकूर - गुरुकुंज उपसा सिंचन योजना

शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळविणाऱ्यांच्या कार्यकारी अभियंता यांच्या घरापुढे तीव्र आंदोलन करणार असल्याचे (Yashomati Thakur protest) अमरावतीच्या माजी पालकमंत्री व आमदार ॲड. यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी म्हटले आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी ठाकूर यांनी केली आहे.

Yashomati Thakur
Yashomati Thakur

By

Published : Nov 5, 2022, 7:41 PM IST

Updated : Nov 5, 2022, 9:21 PM IST

अमरावती: गुरुकुंज उपसा सिंचन योजना प्रकल्पात झालेली लाखो रुपयांच्या विद्यूत साहित्याची चोरी हा सर्वस्वी सरकारी अनास्थेचा भोंगळ कारभार आहे. सरकारने शेतकरी आणि सरकारी यंत्रणेवर दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळविणाऱ्यांच्या कार्यकारी अभियंता यांच्या घरापुढे तीव्र आंदोलन करणार असल्याचे (Yashomati Thakur protest) अमरावतीच्या माजी पालकमंत्री व आमदार ॲड. यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी म्हटले आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी ठाकूर यांनी केली आहे.

मोठ्या कष्टाने प्रकल्प उभा केला आहे:यशोमती ठाकूर म्हणाल्या, उपसा जलसिंचन योजनेसाठी गेल्या दहा वर्षात आम्ही अथक प्रयत्न घेतले आहेत. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री असताना आम्ही या योजनेचे भूमिपूजन केले होते. सततच्या पाठपुराव्याने योजना पूर्णत्वास गेली आहे. लवकरच शेतकऱ्यांना पाणी मिळणार अशी आशा होती, परंतु उपसा सिंचन योजना प्रकल्पाच्या वॉटर लिफ्टिंगकरिता असणारी स्वतंत्र विद्युत पुरवठा यंत्रणा फोडून लाखोंचे साहित्य अज्ञात चोरट्याने लंपास केल्याने या भागातील शेतकऱ्यांचे पाणी मिळण्याचं स्वप्न धुळीस मिळाले आहे.

यशोमती ठाकूर, माजी मंत्री

अधिकाऱ्यांना दिला दोन दिवसाचा अलटीमेटम:गुरुकुंज उपसा सिंचन योजना प्रकल्पाच्या वॉटर लिफ्टिंगकरिता असणारी स्वतंत्र विद्युत पुरवठा यंत्रणा फोडून लाखोंचे साहित्य अज्ञात चोरट्याने लंपास झाले असून यामध्ये अधिकाऱ्यांचा हात आहे. दोन दिवसांत शेतकऱ्यांना पाणी न मिळाल्यास कार्यकारी अभियंता यांच्या घरापुढे तीव्र आंदोलन करणार असल्याचे ठाकूर म्हणाल्या.

चौकशीची केली मागणी:तिवसा जलसंपदा विभागांतर्गत अमरावती- नागपूर महामार्गालगत अप्पर वर्धाच्या मुख्य कालव्याच्या बाजूला गुरुकुंज उपसा सिंचन योजना प्रकल्पाच्या वॉटर लिफ्टिंगकरिता असणारी स्वतंत्र विद्युत पुरवठा यंत्रणा फोडून लाखोंचे साहित्य अज्ञात चोरट्याने लंपास केले. रात्रपाळीत चौकीदार नसल्याची संधी अज्ञात चोरट्यांनी साधली. खरिपातील कपाशी व तूर या पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांनी ४०० हेक्टर क्षेत्रासाठी पाण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने तयारी सुरु असतानाच अचानक चोरट्यांनी रोहित्र फोडले. त्यामुळे आता खरीप हंगामातील शेतकऱ्यांना पाणी मिळणार नाही. दुसरीकडे, रब्बी हंगामातील शेकडो हेक्टर क्षेत्र उपसा सिंचन प्रकल्पाच्या आशेवर असून त्यासाठी जलसंपदा विभागाने पाणी फिरवले आहे, असा आरोप ॲड यशोमती ठाकूर यांनी केला आहे.

Last Updated : Nov 5, 2022, 9:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details