अमरावती- 'कोरेगाव भीमाचा तपास एनआयएकडे सोपवणे ही केंद्र सरकारची दादागिरी आहे. अशा प्रकारची दादागिरी सहन केली जाणार नाही, अशी टीका महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केंद्र सरकारवर केली. त्या अमरावतीमध्ये बोलत होत्या.
यशोमती ठाकूर, महिला व बालविकास मंत्री हेही वाचा - 'कोरेगाव-भीमाप्रकरणी प्रकाश आंबेडकर हेच भिडे आणि एकबोटे यांना वाचवत आहेत'
यावेळी फोन टॅपिंगवरही यशोमती ठाकूर यांनी भाष्य केले. कदाचित माझाही फोन टॅप केला असावा, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे, असेही त्या यावेळी म्हणाल्या.
हेही वाचा - भीमा कोरेगाव प्रकरण: 'केंद्राचा 'हा' निर्णय राज्य सरकारच्या अधिकारांवर गदा आणणारा'
कोरेगाव भीमा दंगलीचा तपास एनआयएकडे सोपवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर अनेक स्तरांमधून टीका होत आहे. हा प्रकार घटनाबाह्य असल्याचे मत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले. तर सत्य बाहेर येण्याच्या भीतीनेच तपास एनआयएकडे देण्याचा केंद्राने उद्योग केल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.