अमरावती- महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात लवकरच दिशा कायदा अंमलात आणला जाण्याची शक्यात आहे. विधानमंडळाचे अधिवेशन संपण्या अगोदरच महाराष्ट्रातही "दिशा" कायदा अंमलात आणला जाणार असल्याची माहिती राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली.
'विधिमंडळाचे अधिवेशन संपण्याआधीच राज्यात "दिशा" कायदा अंमलात आणणार' - आंध्रप्रदेशमधील पशुवैद्यकीय महिलेवर लैंगिक अत्याचार
महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात लवकरच दिशा कायदा अंमलात आणला जाण्याची शक्यात आहे. विधानमंडळाचे अधिवेशन संपण्या अगोदरच महाराष्ट्रातही "दिशा" कायदा अंमलात आणला जाणार असल्याची माहिती राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली.
मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात आंध्रप्रदेशमधील पशुवैद्यकीय महिलेवर लैंगिक अत्याचार करुन तिची निर्दयी हत्या करत तिला पेटवून देण्यात आले होते. त्यानंतर आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्यात "दिशा" कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्यात गुन्हेगारांवर आरोप सिद्ध झाल्यास २१ दिवसात शिक्षेची तरतूद आहे. आता महाराष्ट्रातील महिलांवर वाढत्या अत्याचाराच्या घटना लक्षात घेता. महिलांवरील अत्याचाराला आळा घालण्यासाठी हा कायदा लागू केला जाणार असल्याची माहिती यशोमती ठाकूर यांनी दिली.