महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेतकरी आंदोलनात फूट पाडण्याचा डाव केंद्र सरकारचाच ;मंत्री यशोमती ठाकुरांचा आरोप - शेतकरी आंदोलनाबद्दल बातमी

दिल्ली येथील शेतकरी आंदोलना वरून महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यानी केंद्र सरकारवर टीका केली आहे. त्या म्हणाल्या केंद्र सरकारचा शेतकरी आंदोलनात फूट पाडण्याचा डाव आहे.

Yashomati Thakur criticized the central government for trying to divide the farmers' agitation
शेतकरी आंदोलनात फूट पाडण्याचा डाव केंद्र सरकारचाच ;मंत्री यशोमती ठाकुरांचा आरोप

By

Published : Jan 28, 2021, 6:42 PM IST

Updated : Jan 28, 2021, 7:56 PM IST

अमरावती -दिल्ली येथील शेतकरी आंदोलना वरून राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाना साधला. केंद्र सरकार शेतकऱ्यांचे आंदोलन हाताळण्यास अपयशी ठरले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः का समोर येत नाहीत, ते आपल्या नेत्यांना आंदोलन हाताळण्यासाठी पाठवत आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदीनी समोर येऊन हे आंदोलन सोडवले पाहिजे. या आंदोलनात फूड पाडण्याचा डाव केंद्र सरकारचा असल्याचा आरोप मंत्री यशोमती ठाकुर यांनी केला आहे.

शेतकरी आंदोलनात फूट पाडण्याचा डाव केंद्र सरकारचाच ;मंत्री यशोमती ठाकुरांचा आरोप

या आंदोलनाच्या माध्यमातून संविधानाची तोडफोड केली जात आहे. शेतकरी देशाचा कना आहे. कृषी विधेयक हे बड्या उद्योगपतींना फायदेशीर आहे. केंद्र सरकारला सामान्य माणूस व शेतकऱ्यांचे काही लेन देणं नाही, असहि महिला व बालकल्याण यशोमती ठाकूर म्हणाल्या.

आपण देशाच्या संविधानाला मानतो, त्यामुळे येथे आंदोलन करण्याचा अधिकार हा प्रत्येकालाच आहे. केंद्र सरकार ला ते आंदोलनं हाताळता येत नाही, म्हणून त्यांनी ते हायकोर्टाला सोपवले आहे. ज्या प्रकारे हे आंदोलन केंद्र सरकार सांभाळत आहे, ते चुकीच्या पद्धतीने संभाळत आहे. यावर पंतप्रधान मोदी यांनी बोलले पाहिजे असेही ठाकूर म्हणाल्या.

Last Updated : Jan 28, 2021, 7:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details