अमरावती -राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या राजीनाम्यासाठी भाजपा आणि चंद्रकांत पाटील यांनी आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन म्हणजे केविलवाणा प्रकार असल्याचे प्रतिउत्तर यशोमती ठाकूर यांनी दिले आहे. पोलीस कर्मचारी मारहाण प्रकरणी यशोमती ठाकूर यांना न्यायालयाने तीन महिन्यांनी शिक्षा सुनावल्याने त्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपा आक्रमक झाली आहे.
अगोदर अमित शाहांनी राजीनामा द्यावा -
यशोमती ठाकुरांनी भाजपाला जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. माझ्यावर लावलेले गुन्हे हे राजकीय आकसापोटी लावण्यात आले आहेत. नावावर गंभीर गुन्हे असताना कित्येक भाजपा नेते मोकळे फिरत आहेत. चंद्रकांत पाटलांनी अगोदर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना राजीनामा मागावा, नंतरच मला राजीनामा मागावा. भाजपाच्या लोकांना मला राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकारच नाही, असे म्हणत यशोमती ठाकूर यांनी भाजपावर टीका केली.