महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'अमरावतीमध्ये आठपैकी पाच आघाडीचे आमदार निवडून येतील' - Tewasa Assembly Constituency

अमरावतीत आता 2 काँग्रेसचे आमदार आहेत. तर या निवडणुकीत तिवसा, धामणगाव रेल्वे, दर्यापूर, अचलपूर, मेळघाट व अमरावती या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी मित्रपक्षाचे उमेदवार तगडे आहेत, असा दावा यशोमती ठाकूर यांनी केला.

यशोमती ठाकूर, काँग्रेस नेत्या

By

Published : Oct 19, 2019, 12:23 PM IST

अमरावती- जिल्ह्यातील 8 मतदारसंघापैकी 5 मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार निवडून येतील, असा विश्वास काँग्रेसच्या राज्य कार्याध्यक्ष व आमदार यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला आहे. माध्यमांना प्रतिक्रया देताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला.

यशोमती ठाकूर, काँग्रेस नेत्या

हेही वाचा - अमरावतीमध्ये अवकाळी पाऊस; यंदाही हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडचा घास

यावेळी ठाकूर म्हणाल्या, अमरावतीत आता 2 काँग्रेसचे आमदार आहेत. तर या निवडणुकीत तिवसा, धामणगाव रेल्वे, दर्यापूर, अचलपूर, मेळघाट व अमरावती या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी मित्रपक्षाचे उमेदवार तगडे आहेत, असा दावा यशोमती ठाकूर यांनी केला.

हेही वाचा - राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या मोझरीत हजारो पालख्यांसह भक्त दाखल

काँग्रेसच्या कार्याध्यक्ष यशोमती ठाकूर या तिवसा मतदारसंघ पिंजून काढत आहेत. भाजप सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर आत्महत्या झाल्या आहेत. त्यामुळे भाजपविरोधात महाराष्ट्र लाट असून काँग्रेस सत्तेत येणार, असल्याचे यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details