अमरावती -राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान होणार आहे. त्यासाठी उमेदवारांनी मतदारसंघ पिंजून काढण्याचा सपाटा लावला आहे. प्रचारा दरम्यान अनेकदा दोन उमेदवार एकमेकां समोर उभे ठाकतात. त्यातून अनेकदा वाद होतो. परंतु राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मौन श्रद्धांजली वाहून विजयाचा आशीर्वाद घेण्यासाठी तिवसा मतदार संघाचे काँग्रेसच्या उमेदवार आमदार यशोमती ठाकूर व शिवसेनेचे उमेदवार राजेश वानखडे हे एकाच रांगेत बसले होते. आता नेमक्या कुठल्या उमेदवाराच्या गळ्यात विजयाची माळ पडेल हे चोवीस तारखेला निश्चित होईल.
राष्ट्रसंतांचा आशीर्वाद घेण्यासाठी दोन प्रतिस्पर्धी उमेदवार बसले एकाच रांगेत - अमरावती विधानसभा निवडणूक 2019
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मौन श्रद्धांजली वाहून विजयाचा आशीर्वाद घेण्यासाठी तिवसा मतदार संघाचे काँग्रेसच्या उमेदवार आमदार यशोमती ठाकूर व शिवसेनेचे उमेदवार राजेश वानखडे हे एकाच रांगेत बसले होते. आता नेमक्या कुठल्या उमेदवाराच्या गळ्यात विजयाची माळ पडेल हे चोवीस तारखेला निश्चित होईल.
निवडणूकीच्या रणधुमाळीत उमेदवारासाठी वेळ हा अतिशय महत्वाचा असतो. प्रचारा दरम्यान उमेदवार धार्मिक स्थळी भेटी देत असताना. शुक्रवारी दुपारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 51 व्या पुण्यतिथी महोत्सवा निमित्त राष्ट्रसंताना श्रद्धांजली वाहण्यासाठी दरवर्षी याही वर्षी आमदार यशोमती ठाकूर आल्या होत्या. यशोमती ठाकूर यांच्या आगमनाच्या दहा मिनिटातच शिवसेचे उमेदवार राजेश वानखेडे हे सुद्धा तुकडोजी महाराज यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आले होते. यावेळी यशोमती ठाकूर व राजेश वानखडे हे एकाच रांगेत बसले होते. यावेळी योगगुरू रामदेव बाबा हे देखील उपस्थित होते.