अमरावती - 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी मेळघाटातील शेकडो गावात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय साध्या पध्दतीने आदिवासी बांधवांनी हा दिन साजरा केला. आदिवासी समाजाचे दैवत असलेल्या क्रांती सूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी आदिवासी नृत्यही करण्यात आले.
मेळघाटात कोरोनामुळे साधेपणाने साजरा झाला जागतिक आदिवासी दिवस - मेळघाट जागतिक आदिवासी दिवस
दरवर्षी मेळघाटातील शेकडो गावात हा जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय साध्या पध्दतीने आदिवासी बांधवांनी हा दिन साजरा केला. आदिवासी समाजाचे दैवत असलेल्या क्रांती सूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
आदिवासी समाजामध्ये होळी सणाला अतिशय महत्त्व आहे. त्याचप्रमाणे आदिवासी दिन सुद्धा या लोकांसाठी महत्त्वाचा आहे. या दिवशी आदिवासी बांधव एकत्र येऊन क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांचे पूजन करतात. यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने साध्या पद्धतीने हा सोहळा पार पडला. चिखलदरा तालुक्यातील टेंबूर सोडा या गावातही आदिवासी बांधवांनी एकत्र येऊन आदिवासी नृत्य सादर करून हा जागतिक आदिवासी दिन साजरा केला.
दरम्यान, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज राहतो. अमरावतीच्या मेळघाटातसुद्धा मोठ्या संख्येने आदिवासी समाज वास्तव्यास आहे. आता पर्यंत अनेक आदिवासी दिन या समाजाने साजरे केले असले, तरी त्यांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता, सुख-सोयी मिळून देणारा सोनियाचा दिन मात्र कुठलेच राज्यकर्ते आणू शकले नाहीत.