महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

World record performance : दृष्टीहीन सायकलपटूची जनजागृतीसह विश्वविक्रमी कामगिरी

पुर्णतः दृष्टिहीन ( Completely blind ) असतानाही आत्मबळ आणि जिद्दीच्या जोरावर महाराष्ट्रातील युवकाने (By the youth of Maharashtra) 45 दिवसात मुंबई ते श्रीनगर (Mumbai to Srinagar) श्रीनगर ते कन्याकुमारी ( Srinagar to Kanyakumari ) आणि कन्याकुमारी ते थेट मुंबई असे साडेसात किलोमीटरचे अंतर सायकल चालवून गाठले आहे. त्याने ही विश्वविक्रमी कामगिरी ( World record performance ) जनजागृती करत केली आहे. आता त्याला या विक्रमाची नोंद होण्याची प्रतीक्षा आहे.

Blind cyclists
दृष्टीहीन सायकलपटू

By

Published : Jan 7, 2022, 7:49 PM IST

अमरावती: दृष्टी नसली तरी आपल्याला सायकल चालवता यावी अशी इच्छा अजय लालवाणी यांना लहानपणीच झाली, मित्रांच्या मदतीने सायकल चालवायला शिकणारा अजय मुंबई महापालिकेत कार्यरत आहे. त्याने मुंबई ते श्रीनगर, श्रीनगर ते कन्याकुमारी असा मोठा पल्ला गाठण्याचे स्वप्न साकारायचे ठरवले आणि 15 नोव्हेंबर ते 19 डिसेंबर 2021 या 45 दिवसात ते पूर्णही केले आहे.

सोळा जणांच्या मार्गदर्शनात ही मोहीम राबवण्यात आली. समन्वयकांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार सायकलने इतका मोठा प्रवास गाठू शकलो असे अजय यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. अमरावती मधून वैभव पवार, रत्नागिरी येथून संदेश चव्हाण यासह मुंबईवरून काही समन्वयक सोबत असल्याचेही त्यांनी सांगितले.

दिवासाला 200 की.मि प्रवास
45 दिवसांच्या प्रवासात अजय हा दिवसाला 200 किलो मीटर पर्यंत सायकल चालवत होता. रोज पहाटे 4 वाजता उठल्यावर 5 वाजता प्रवासाला सुरुवात व्हायची .एका खासगी कंपनीने त्याला या आर्थिक सहाय्य पुरविले होते. प्रवासादरम्यान अजयला सायकल चालवण्यासाठी मार्गदर्शन करणारे जे पथक होते त्यांच्या सोबत वॉकीटॉकी असायची या द्वारे ते सायकल कोणत्या बाजूला न्यायची तसेच समोरून, मागून येणाऱ्या वाहनांची सूचना दिली जायची. सोबतच्या एका बसमध्ये जेवणाची व्यवस्था होती. रोज 200 की.मी सायकल चालवल्यावर दिवसाचा प्रवास थांबायचा. अखेरच्या दिवशी अजयने 17 तासात 300 की.मीचा पल्ला गाठला.

दृष्टीहीन सायकलपटू
असा दिला संदेश इतका मोठा प्रवास पूर्ण करण्याचे आव्हान आम्ही यशस्वीरित्या पार केले याचा आम्हाला आनंद आहे. सायकल द्वारे केलेल्या या प्रवासादरम्यान रस्ते सुरक्षा जागरूकता आणि दृष्टिहीन लोकांसाठी सर्वसामान्यांमध्ये जागृती निर्माण करणे असा संदेश दिल्याचे अजय यांनी सांगितले.विक्रमाच्या नोंदीची प्रतीक्षापुर्णतः दृष्टिहीन असणाऱ्या व्यक्तीने 45 दिवसात साडेसात हजार किलोमीटर सायकल चालवणे हा एक विक्रम असून याची दखल घेतली जावी आणि या विश्वविक्रमाची नोंद व्हावी या साठी आम्ही पत्रव्यवहार केला आहे. अशी नोंद होईल याची प्रतीक्षा आहे असेही अजय यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details