अमरावती -तीव्र इच्छा असेल तर अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही. तंबाखूचे व्यसन असलेल्या अनेकांनां प्रयत्न करुनही तंबाखू सुटत नाही. मात्र, आपल्या इच्छाशक्तीच्या जोराबर अमरावतीतील एका व्यापाऱ्याने तंबाखू सोडली व ते सध्या व्यसनमुक्त झाले आहेत. जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून त्यांनी आपला अनुभव 'इटीव्ही भारत'च्या माध्यमातून सांगितले.
...जगायचं असेल तर तंबाखू सोडा -दिवस-रात्र पान, तंबाखू, खर्रा खात होतो. पान टपरीवाला मी दिसताच माझे पान तयार करून ठेवत होता. घरेच सगळे तंबाखू खाण्यापासून रोखायचे मात्र, मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होते. एक दिवस तोंडात फोड आला त्यानंतर मी डॉक्टरांकडे गेलो. त्यावेळी तुम्ही तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थ खाता का, असे डॉक्टरांनी विचारले. हो म्हणताच जगायचं असेल तर तंबाखू सोडा, असे डॉक्टरांनी मला ठणकावले. हे ऐकताच मी धास्तावलो. मी लगेचच खिशात असणारी खर्ऱ्याची पुडी रुग्णालयातील डस्टबीनमध्ये फेकली. त्यानंतर आज सहा वर्षे झाली मी तंबाखू खाल्लोच नाही. ज्यांना तंबाखू सोडायची आङे त्यांनी मनाची ठाम तयारी करावी. मनाची तयारी असल्यास तंबाखू सुटते, असा सल्लाही राजूभाई केडिया यांनी दिला.
'असे' आहेत तंबाखू सेवनाचे प्रकार -तंबाखूसह विडी, सिगारेटमधून तंबाखूचे सेवन केले जाते. पान मसाला, गुटख्यातून तंबाखू सेवन आणि हुक्काच्या माध्यमातून तंबाखूचे सेवन केले जाते. तंबाखूमध्ये पाच हजार रासायनिक द्रव्य आणि 100 हून अधिक हानीकारक घटक आहेत. यामध्ये निकोटीन, हायड्रोजन, सायनाइड, फार्मर्लाडाईड, लेड, आर्सेनिक अमोनिया आणि रेडिओॲक्टिव्ह एलिमेंट्स चा समावेश असतो.