अमरावती- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्यावतीने जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कर्मभूमीतून महाजनादेश यात्रेचा १ ऑगस्टपासून शुभारंभ होणार आहे. त्यामुळे दोन दिवसावर येऊन ठेपलेल्या या कार्यक्रमासाठी भव्यदिव्य वॉटरप्रुफ मंडप उभारला जात आहे. 1 लाख लोक बसतील असा मंडप उभारण्याचे काम भरपावसात युद्ध पातळीवर सुरू आहे. यात जवळपास 700 पोलिसांचा बंदोबस्त कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने राहणार आहे.
भरपावसात भाजपच्या 'महाजनादेश' यात्रेची तयारी; 1 ऑगस्टपासून शुभारंभ - CM DEVENDRA FADNAVIS
तुकडोजी महाराज यांच्या पावन भूमीतील गुरुकुंज मोझरीत भाजपने महाजनादेश यात्रा सुरू करण्याचे ठरवले आहे. यात 1 ऑगस्टला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही महाजनादेश यात्रा निघणार आहे. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व केंद्रातील चार मंत्री व राज्यातील सर्व भाजपचे मंत्री व आमदार उपस्थित राहणार आहेत.

तुकडोजी महाराज यांच्या पावन भूमीतील गुरुकुंज मोझरीत भाजपने महाजनादेश यात्रा सुरू करण्याचे ठरवले आहे. यात 1 ऑगस्टला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही महाजनादेश यात्रा निघणार आहे. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व केंद्रातील चार मंत्री व राज्यातील सर्व भाजपचे मंत्री व आमदार उपस्थित राहणार आहेत. दोन दिवसांनी म्हणजे १ ऑगस्टला या यात्रेचा शुभारंभ होणार आहे. अमरावती जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात पाच दिवसापासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने मंडप उभारण्यात मोठी अडचण होत आहे, तरी युद्ध पातळीवर हे काम सुरू आहे. पाऊस जरी सभा दरम्यान आला तरी कार्यक्रमात खंड पडणार नाही कारण, वॉटरप्रुफ मंडप हा असणार आहे. सभा ठिकाणी चिखल साचल्याने जेसीबीच्यावतीने व खाली गिट्टी टाकून चिखल दूर करण्याचे प्रयत्न सुरू आत.हे