अमरावती -जिल्हा परिषद अंतर्गत 15 वा वित्त आयोग सन 2020-2021 या योजनेंतर्गत शिराळा या गावात दोन महिन्यांपूर्वी सिमेंट-काँक्रीटची नाली बांधण्यात आली. 3 लाख रुपये खर्चून दोन महिन्यांपूर्वी झालेल्या बांधकामासाठी मे महिन्याच्या सभेत ग्रामपंचायत सभेत मंजुरी देण्याबाबत प्रस्ताव ठेवण्यात आला. या अजब प्रकाराला विरोधी सदस्यांनी आक्षेप घेतला असताना गावातील नागरिकांनी या प्रकरणाची तक्रार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.
8 मार्च ला भूमिपूजन 25 मे ला मंजुरी -
शिराळा गावात जिल्हा परिषद स्तरावर नाली बांधकाम, पेविंग ब्लॉकच्या कामे होणार होती. गावातील वॉर्ड क्रमांक येथील सिमेंट-काँक्रीटच्या नालीच्या कामाचे भूमीजन करण्यात आले होते. या सोहळ्याला सरपंच अंकिता तायडे, सभापती संगिता तायडे, सदस्य अलका देशमुख प्रामुख्याने उपस्थित होत्या. भूमिपूजन सोहळ्यानंतर या कामाला सुरुवात होऊन काम पूर्ण करण्यात आले. आता मात्र 25 मे रोज ग्रामपंचायतच्या बैठकीत या कामाचा प्रस्ताव मांडण्यात आला. हे काम पूर्ण झाले असताना झालेल्या कामाचा प्रस्ताव सभेत कसा आला, असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला.