अमरावती -'बेटी बचाव, बेटी पढाव', 'बेटी है तो संसार है' अशा घोषणा देत निघालेल्या बेटी बचाव रॅलीने आज अमरावती शहर दुमदुमले. जागतिक महिला दिनानिमित्त येथील बेटी बचाव ग्रुपच्या वतीने नेहरू मैदान ते जिल्हा क्रीडा संकुलपर्यंत ही रॅली आयोजित केली होती.
जागतिक महिला दिन : 'बेटी बचाव' रॅलीने दुमदुमली अमरावती
या रॅलीत विविध शाळेतील विद्यार्थी, जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर, विविध महिला बचत गट आणि अनेक महिला संघटना सहभागी होत्या. यावेळी सर्व उपस्थितांनी मुलींना मुलांप्रमाणे अधिकार, स्वातंत्र्य देण्याची शपथ घेतली
या रॅलीत विविध शाळेतील विद्यार्थी, जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर, विविध महिला बचत गट आणि अनेक महिला संघटना सहभागी होत्या. जिल्हा क्रीडा संकुल येथे पोलीस आयुक्त संजय बाविस्कर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी मनीषा खत्री, माजी लेडी गव्हर्नर कमलताई गवई, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, आय.एम.एचे अध्यक्ष डॉ. पद्माकर सोमवंशी यांनी रॅलीचे स्वागत केले.
यावेळी सर्व उपस्थितांनी मुलींना मुलांप्रमाणे अधिकार, स्वातंत्र्य देण्याची शपथ घेतली. बेटी बचाव ग्रुपच्यावतीने गट तीन वर्षांपासून जागतिक महिला दिनाला हा उपक्रम राबविला जातो. बेटी बचाव ग्रुपच्या अध्यक्ष डॉ. प्रांजल शर्मा, सचिव डॉ. नीरज मुरके यांच्यासह ग्रुपच्या सदस्यांनी रॅली यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केलेत.