अमरावती- सकाळी नैसर्गिक विधीकरीता गावाशेजारील एका शेतात गेलेल्या महिलेवर दोन मादी अस्वलांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना अमरावती जिल्ह्यातील चिखलदारा तालुक्यातील बागलिंगा या गावात घडली आहे. मलकाय बेलसरे असे अस्वलांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव असून, सध्या तिच्यावर अचलपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दोन अस्वलांच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी; चिखलदारा तालुक्यातील घटना - achalpur
सकाळी नैसर्गिक विधी करिता गावाशेजारील एका शेतात गेलेल्या महिलेवर दोन मादी अस्वलांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना अमरावती जिल्ह्यातील चिखलदारा तालुक्यातील बागलिंगा या गावात घडली आहे .

मादी अस्वलांच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी
बागलिंगा गावात राहणारी ही महिला सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास नैसर्गिक विधीकरीता गावालागतच्या शेतात गेली होती. त्यावेळी तेथे दोन अस्वलांनी या माहिलेवर हल्ला केला. यात महिला गंभीर जखमी झाली आहे. महिलेच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली आहे. महिलेचा आरडाओरडा ऐकूण गावकरी या महिलेच्या बचावासाठी धावून गेले. त्यामुळे महिलेचे सुदैवाने प्राण वाचले.