महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शौचालयास गेलेल्या महिलेची बलात्कार करून हत्या, अमरावती जिल्ह्यातील घटना - महिलेची हत्या लोणी टाकळी

घरून काही अंतरावर शौचालयास गेलेल्या एका महिलेवर बलात्कार करून तिची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोणी टाकळी या गावात घडली.

Police Thane Loni
पोलीस ठाणे लोणी

By

Published : Dec 6, 2021, 4:11 AM IST

अमरावती -घरून काही अंतरावर शौचालयास गेलेल्या एका महिलेवर बलात्कार करून तिची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोणी टाकळी या गावात घडली. या प्रकरणी महिलेच्या वडिलांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.

हेही वाचा -World Disabled Day : जगण्यासाठी अपंगांचा संघर्ष; शासकीय योजना आणि आत्मबळाची साथ

मृत महिला ही काही दिवसांपूर्वी भाऊबीजसाठी लोणी येथे भावाकडे माहेरी आली होती. तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. महिला शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास शौचालयासाठी घराबाहेर गेली होती. परंतु, वेळ होऊनही ती घरी न परतल्याने घरच्यांनी परिसरात पाहणी केली असता एका झाडाखाली तिचा मृतदेह आढळला.

या प्रकाराची माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या प्रकरणाचा उलगडा केला. यामध्ये महिलेवर बलात्कार करून तिची साडीने गळा आवळून हत्या केल्याचे समोर आले.

हेही वाचा -भाजीपाल्याच्या दरात आणखीन घसरण; शेतकरी पुन्हा संकटात

ABOUT THE AUTHOR

...view details