अमरावती- नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा या गावात मोठ्या प्रमाणावर अवैधरीत्या दारू विक्री होत असल्याने मोठ्यांसह लहान मुलांनाही दारूचे व्यसन लागले आहे. त्यामुळे अनेकांचे संसार मोडले आहेत. त्यामुळे या गावातील दारू विक्री बंद झाली पाहिजे, यासाठी महिलांनी प्रजासत्ताकदिनापासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
मंगरूळ चव्हाळात अवैध दारूविक्री बंदसाठी महिलांचे उपोषण - Amravati latest news
अमरावतीच्या मंगरूळ चव्हाळात अवैध दारूविक्री बंदसाठी महिलांनी उपोषण सुरु केले आहे. तर अनेक वेळा निवेदने देऊनही कारवाई झाली नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

अवैध दारूविक्री बंदसाठी महिलांचे उपोषण
अवैध दारू विक्री बंदसाठी महिलांचे उपोषण
मंगरुळ चव्हाळा या गावातील लोकवस्ती 7 हजार आहे. या गावात अवैधरीत्या दारू विकली जात असल्यामुळे याबाबत येथील महिलांनी अनेकदा अधिकाऱ्यांना निवेदन ही दिली आहेत. परंतु, याबाबत कोणतीही कारवाई झाली नाही.
गावात जवळपास 30 ते 40 ठिकाणी अवैधरीत्या दारूविक्री केली जाते. दारू बंदीच्या या आंदोलनात आता गावातील काही पुरुषांनी सहभाग नोंदवला आहे. गावातील दारू विक्री तत्काळ बंद न झाल्यास भविष्यात मोठा लढा उभारणार असल्याच्या इशारा नागरिकांनी केला आहे.