अमरावती - शहरातील सिद्धार्थनगरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अवैध दारू विक्री सुरू आहे. याबाबत प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही कुठलीच दखल न घेतल्याने संतप्त महिलांनी या अवैध दारू विक्रीचे कॅमराद्वारे स्टिंग ऑपरेशन केले. या स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ महिलांनी माध्यमांना दिला आहे. या व्हिडिओमध्ये एक महिलाच ग्राहक म्हणून दारू खरेदी करण्यासाठी गेली असल्याचे दिसते आहे.
अमरावतीच्या सिद्धार्थनगरमधील अवैध दारू विक्रीचे महिलांनी केले स्टिंग ऑपरेशन - सिद्धार्थनगर अवैध दारूविक्री
अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सिद्धार्थनगरमध्ये मागील गेल्या अनेक वर्षांपासून अवैध दारू विक्री केली जाते. या अवैध दारू विक्री विरोधात परिसरातील शेकडो महिला खूप दिवसांपासून आवाज उठवत आहेत. अवैध दारू विक्री व्यवसायाविरोधात गाडगेनगर पोलिसांना तक्रार देऊनही कुठलीच कारवाई झाली नाही.
अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सिद्धार्थनगरमध्ये मागील गेल्या अनेक वर्षांपासून अवैध दारू विक्री केली जाते. या अवैध दारू विक्री विरोधात परिसरातील शेकडो महिला खूप दिवसांपासून आवाज उठवत आहेत. अवैध दारू विक्री व्यवसायाविरोधात गाडगेनगर पोलिसांना तक्रार देऊनही कुठलीच कारवाई झाली नसल्याचा या महिलांचा आरोप आहे.
या परिसरात शहराच्या विविध भागातून लोक दारू पिण्यासाठी येतात. होम क्वारंन्टाईनचा शिक्का असलेले लोकसुद्धा या परिसरात दारू खरेदीसाठी येतात. त्यामुळे या परिसरात कोरोनाचा धोका वाढण्याची भीती येथील महिलांनी व्यक्त केली. प्रशासन आणि पोलीस कुठलीच कारवाई करत नसल्याने या महिलांनी स्टिंग ऑपरेशन केले व माध्यमांच्या मदतीने आपली समस्या मांडली.