महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अचलपुरात बालविवाह रोखण्यात यश; दीड महिन्यातील सहावी घटना - अचलपूरात बालविवाह रोखण्यात यश

अल्पवयीन बालकाचे बालविवाह होऊ नये याकरिता जिल्हा बाल संरक्षण कक्षातील अधिकारी कर्मचारी कठोर मेहनत घेत आहेत. सातत्याने संबधित स्टेकहोल्डरसोबत संपर्कात आहे.

बालविवाह
बालविवाह

By

Published : Apr 24, 2021, 8:09 PM IST

अमरावती -जिल्ह्यातील बाल विवाहाचे सत्र थांबता थांबत नाहीये. गेल्या दीड महिन्यात 6 बालविवाह रोखण्यात बाल सरंक्षण कक्षाला यश आले आहे. दोन दिवसापूर्वीच मोर्शी तालुक्यामध्ये दोन बहिणीचे बालविवाह रोखल्यानंतर आज पुन्हा अचलपूरमध्ये एका 15 वर्षीय बलिकेचा बालविवाह रोखण्यात आला.

मुलीच्या पालकांकडून लिहून घेतले हमीपत्र
26 एप्रिलला हा बालविवाह होणार असल्याची गोपनीय तक्रार बाल सरंक्षण कक्ष आणि पोलीस स्टेशन अचलपूरला मिळाली होती. तात्काळ जिल्हा बाल सरंक्षण अधिकारी अजय डबले आणि बाल सरंक्षण अधिकारी भूषण कावरे यांनी चाइल्ड लाइनचे अमित कपूर व अजय देशमुख यांच्यासोबत अचलपूर गाठले. पोलिसांच्या मदतीने वधू पक्षाकडे जात मुलीच्या आई वडिलांसोबत वर मुलाची बैठक घेण्यात आली. त्यांच्याकडून मुलीचे 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत लग्न न करण्याचे हमी पत्रक लिहून घेण्यात आले. तसेच १८ वर्षे पूर्ण होण्याच्या आगोदर विवाह केल्यास गुन्हा दाखल करून कार्यवाही करण्याचा इशाराही देण्यात आला.

जिल्हा बाल संरक्षण कक्ष दक्ष
अल्पवयीन बालकाचे बालविवाह होऊ नये याकरिता जिल्हा बाल संरक्षण कक्षातील अधिकारी कर्मचारी कठोर मेहनत घेत आहेत. सातत्याने संबधित स्टेकहोलडरसोबत संपर्कात आहे. यामुळेच बालविवाह थांबविण्यात जिल्हा बाल सरंक्षण कक्षाला यश येत असल्याचे मत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय डबले यांनी व्यक्त केले.

ABOUT THE AUTHOR

...view details