अमरावती - जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील अशोक नगर येथे तीन वर्षांपूर्वीं लग्न झालेल्या नवविवाहितेचा मृतदेह घरात आढळून आला. वृषाली पंकज कडू असे या २६ वर्षीय मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी कुर्हा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून माहेरच्या लोकांनी अक्षेप घेतला होता.
गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला नवविवाहितेचा मृतदेह, धामणगाव रेल्वे येथील अशोकनगरातील घटना - अमरावती न्यूज
महसूल व पोलीस प्रशासनाने मध्यस्थी केल्यानंतर तब्बल आठ तासांनंतर घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. धामणगाव रेल्वे तालुक्यातील अशोकनगर येथील वृषाली कडू हिचा मृतदेह आपल्या राहत्या घरात गळफास असलेल्या अवस्थेत आढळून आला.
![गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला नवविवाहितेचा मृतदेह, धामणगाव रेल्वे येथील अशोकनगरातील घटना](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8265125-506-8265125-1596346755864.jpg)
दरम्यान, सासरच्या व माहेरच्या मंडळींनी मृत्यूच्या कारणावरुन वाद सुरू होता. त्यामुळे घटनास्थळ पंचनाम्याची प्रक्रिया रखडली होती. महसूल व पोलीस प्रशासनाने मध्यस्थी केल्यानंतर तब्बल आठ तासांनंतर घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. धामणगाव रेल्वे तालुक्यातील अशोकनगर येथील वृषाली कडू हिचा मृतदेह आपल्या राहत्या घरात गळफास असलेल्या अवस्थेत आढळून आला.