महाराष्ट्र

maharashtra

कर्तव्यावर येणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू; पोलीस ठाणे सील

By

Published : Jul 5, 2020, 5:34 PM IST

शुक्रवारी अमरावती शहर कोतवाली पोलीस ठाण्यातील एका महिला कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. यामुळे पोलीस ठाणे सील करण्यात आले असून परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले आहे.

सील केलेले पोलीस ठाणे
सील केलेले पोलीस ठाणे

अमरावती - शहर कोतवाली पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलीस कर्मचाऱ्याला गुरुवारी (दि. 2 जुलै) अचानक ताप आल्याने तिला जिल्हा सामान्य रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. यावेळी तिचा स्वॅब (घशातील स्त्राव) घेण्यात आला. अहवाल येण्यापूर्वीच त्यांची शुक्रवारी (दि. 3 जुलै) सायंकाळी प्राणज्योत मालवली. तिला कोरोना झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले असून या घटनेमुळे पोलीस यंत्रणा हादरली आहे.

महिला पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू
कोरोनामुळे दगवलेली महिला पोलीस कर्मचारी सोनल कोपनी परिसरातील रहिवासी होती. त्यांच्या मुलाला, आईला आणि भावलाही कोरोनाची लागण झाली आहे. घरात तिघांना कोरोना झाला असताना त्या शहर कोतवाली पोलीस ठाण्यात सेवेवर नियमित येत होत्या. गुरुवारी त्यांना बरे वाटत नसल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोना चाचणी अहवाल येण्यापूर्वीच महिला पोलीस कर्मचारीने अखेरचा श्वास घेतल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयाती खळबळ उडाली.

मृत महिला पोलीस कर्मचारिचा मोठा मुलगा सैन्यात असून तो उरी येथे तैनात आहे. आईच्या मृत्यूची माहिती मिळताच तो अमरावतीला येण्यासाठी निघाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
शहर कोतवाली पोलीस ठाण्यात मृत महिला पोलीस कर्मचारी कर्तव्यावर येत होती. यामुळे या पोलीस ठाण्याला कंटेंटमेंट झोन (प्रतिबंधीत क्षेत्र) घोषित करण्यात आले आहे.

शनिवारी (दि. 4 जुलै) दिवसभर पोलीस ठाण्यात बाहेरच्या व्यक्तीला येण्यास मनाई करण्यात आली. सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे.

हेही वाचा -अमरावतीत कोरोनाबाधितांची संख्या 680 वर; शनिवारी आढळले 30 नवे रुग्ण

ABOUT THE AUTHOR

...view details