महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Melghat News: मेळघाटात महिलेने दिला एकाच वेळी चार मुलींना जन्म, सोनोग्राफीत दाखवले होते दोनच बाळ - birth to four daughters at same time in Melghat

कुषोपण, माता मृत्यू, बालमृत्यु या कारणांमुळे अमरावती जिल्ह्यातील मेळघाट नेहमीच चर्चेत असते. परंतु आता मेळघाट तालुक्यात एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. मेळघाटातील धारणीमध्ये एका महिलेने एकाच वेळी चार मुलींना जन्म दिला आहे. माता आणि बालकांची प्रकृती स्थिर आहे.

Melghat News
एकाच वेळी चार मुलींना जन्म

By

Published : Jul 13, 2023, 2:07 PM IST

Updated : Jul 14, 2023, 12:07 PM IST

अमरावतीत एकाच वेळी चार मुलींना जन्म दिल्याची घटना

अमरावती :आपण आतापर्यंत जुळे-तिळे झाल्याच्या घटना ऐकल्या आहेत. परंतुमेळघाटातील दूनी या गावातील रहिवासी असणाऱ्या एका महिलेने धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात एकाच वेळी चार मुलींना जन्म दिला आहे. माता आणि चारही मुली सुखरूप आहेत. एकाच वेळी चार मुलींना जन्म दिल्याचा विषय संपूर्ण मेळघाटात चर्चेचा ठरला आहे. जन्माला आलेल्या चारही मुलींचे वजन हे दीड किलोच्या आत आहे. त्यामुळे त्यांची अति दक्षता कक्षात काळजी घेतली जात आहे. मातेच्या प्रकृतीची देखील काळजी घेतली जात असल्याची माहिती धारणी उपजिल्हा रुग्णालयातील बालरोग तज्ञ तथा वैद्यकीय अधीक्षक दयाराम जावरकर यांनी दिली आहे.

गर्भावस्थेतही 'ती' करायची मजुरी :दूनी येतील रहिवासी पपीता बलवंत (वय 24) ही पती बलवंत उईके याच्यासोबत वरुड तालुक्यात मजुरीचे काम करीत असताना तिला गर्भधारणा झाली. यानंतर तिने आपल्या गावात येऊन दूनी येथील आरोग्य उपकेंद्रात गर्भवती झाल्याची नोंद केली. गावातील आशा वर्करने तिला महिनाभराच्या औषधी दिल्या. औषधी घेतल्यावर ती कामासाठी वरुडला परत आली. गवंडी काम करीत असतानाच औषध संपल्यावर ती दूनीला जायची आणि औषध घेऊन परत वरुडला यायची. पपीता उईके आणि बलवंत उईके या दांपत्याला पहिला मुलगा देखील आहे.


सोनोग्राफीत दाखवले होते दोनच बाळ : वरुड येथे मजुरी काम करत असताना पपीता उईके या पाच महिन्याच्या गर्भवती असताना त्यांना त्रास जाणवला होता. तेव्हा त्यांनी वरुड येथील एका खाजगी रुग्णालयात जाऊन सोनोग्राफी केली होती. त्यावेळी सोनोग्राफी रिपोर्टवरून त्यांना दोन बाळ होणार असे सांगण्यात आले होते. विशेष म्हणजे आठ महिन्यानंतर त्या आपल्या घरी दूनी आल्या असता धारणी उपजिल्हा रुग्णालयात त्यांची दुसऱ्यांदा सोनोग्राफी केली असता तेव्हाही त्यांच्या गर्भात दोनच बाळ असल्याचे स्पष्ट झाले होते. असे असताना देखील बुधवारी धारणी उपजिल्हा रुग्णालयात प्रसूती दरम्यान पपीता उईके यांनी चार मुलींना जन्म दिल्याने डॉक्टरांसह सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.


हेही वाचा :

  1. Old Man Become Father: 62 व्या वर्षीय झाला 3 मुलांचा बाप, 30 वर्षाच्या पत्नीने दिला तीन बाळांना जन्म
  2. Woman Gave Birth Baby In Kolhapur : झोळीमध्येच दिला बाळाला जन्म; रस्ता नसल्याने नागरिक त्रस्त
  3. Woman Gave Birth in Train: सुरतमध्ये रेल्वेतच जन्मले बाळ, महिला प्रवाशांनीच प्रसंगावधान राखून केलं बाळंतपण
Last Updated : Jul 14, 2023, 12:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details