अमरावती - चिखलदरा तालुक्यातील घटांग गावाच्या हद्दीत एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील घटांग या गावाच्या हद्दीत रस्त्याकडेला असलेल्या झुडपाजवळ एका ३० वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. मृत महिलेचा गळा ओढणीच्या सहाय्याने आवळून हत्या केली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. दरम्यान, मृत महिलेची ओळख पटली नसून या महिलेचा मृत्यू नेमका कशाने झाला याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान, घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.