अमरावती- कोरोनामुळे अमरावती विभागात झारखंड राज्यातील अनेक कामगार अडकून पडले होते. अशा एकूण 1 हजार 496 मजुरांना घेऊन अमरावती रेल्वेस्थानकावरून 24 डब्यांची विशेष गाडी बुधवारी सायंकाळी डालटनगंजकडे रवाना झाली. अमरावती विभागाच्या अकोला, यवतमाळ, बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यात उत्तरप्रदेश आणि बिहार येथील मजुरांसह झारखंड राज्यातील मजूर अडकले होते.
अमरावतीहून झारखंडकडे विशेष गाडी रवाना, 1 हजार 496 कामगार परतणार स्वगृही
एकूण 1 हजार 496 मजुरांना घेऊन अमरावती रेल्वे स्थानकावरून 24 डब्यांची विशेष गाडी बुधवारी सायंकाळी डालटनगंजकडे रवाना झाली. जिल्हा प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे सर्व मजुरांना शांतपणे गाडीत बसविण्यात आले. नानक रोटी ट्रस्टच्यावतीने गाडीने जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला जेवणाचा डबा देण्यात आला.
यापूर्वी उत्तरप्रदेश आणि बिहारसाठी अमरावती रेल्वे स्थानकावरून विशेष गाड्या सोडण्यात आल्या. तर, बुधवारी झारखंड येथील मजुरांना घेऊन थेट डालटनगंजसाठी खास गाडी रवाना झाली. ज्या मजुरांनी आधीच नोंदणी करून तिकीट घेतले होते, त्या सगळ्यांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसद्वारे अमरावती रेल्वे स्थानकावर आणण्यात आले.
जिल्हा प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे सर्व मजुरांना शांतपणे गाडीत बसविण्यात आले. नानक रोटी ट्रस्टच्यावतीने गाडीने जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला जेवणाचा डबा देण्यात आला. यावेळी विभागीय आयुक्त पियुष सिंह आणि जिल्हाधिकारी शैलेश नवाल उपस्थित होते.