अमरावती - चांदूर रेल्वे तालुक्यात शनिवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास जोरदार वाऱ्यामुळे अनेकांच्या घराचे छप्पर उडाले. यावेळी विजांसह पावसाने हजेरी लावल्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या पावसामुळे घुईखेडमध्ये २४ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित आहे.
अमरावतीत जोरदार पाऊस; घुईखेडमध्ये घरांचे छप्पर उडाले, २४ तासांपासून वीज पुरवठाही खंडित - पाऊस
अमरावतीच्या घुईखेडमध्ये जोरदार वाऱ्यामुळे अनेकांच्या घराचे छप्पर उडाले.
![अमरावतीत जोरदार पाऊस; घुईखेडमध्ये घरांचे छप्पर उडाले, २४ तासांपासून वीज पुरवठाही खंडित](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3511501-thumbnail-3x2-amr.jpg)
दोन दिवसांपूर्वीच चांदूर रेल्वे शहरासह तालुक्यातील सोनगाव आणि इतर भागात वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले होते. यानंतर पुन्हा शनिवारी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे तालुक्यात पुन्हा अनेकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. घुईखेडमधील शेकडोंच्या घरावरील पत्रे उडाले. याशिवाय विजेचे काही खांब वाकले असून विद्युत तारा गावात लटकत आहे.
घुईखेड गावात भारनियमामुळे शनिवारी सकाळी साडे सहा वाजता वीज गेली होती. मात्र, आता रविवारचा दिवस उजाडून २४ तास उलटले तरी या गावातील विद्युत पुरवठा चालू झालेला नाही.