महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सत्कारावर भर न देता सत्कार्यावर भर द्यायचा आहे - कृषीमंत्री बोंडे - उद्योजक संजय जाधव, ऍड श्रीकांत खोरगडे

शहराच्या मध्यभागात असणाऱ्या मालतेकडीवर सकाळी नियमित फिरायला येणारे डॉ. अनिल बोंडे आता राज्याचे कृषिमंत्री झाले आहेत. शनिवारी सकाळी ते शिवटेकडीवर फिरायला आले असता त्यांचा या तेकडीवर फिरायला येणाऱ्या अमरावतीकरांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

सत्कारासोहळ्यादरम्यान बोलतांना राज्याचे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे

By

Published : Jun 30, 2019, 9:57 PM IST

अमरावती- शहराच्या मध्यभागात असणाऱ्या माळटेकडीवर सकाळी नियमित फिरायला येणारे डॉ. अनिल बोंडे आता राज्याचे कृषीमंत्री झाले आहेत. शनिवारी सकाळी ते शिवटेकडीवर फिरायला आले असता त्यांचा या तेकडीवर फिरायला येणाऱ्या अमरावतीकरांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वेळ फार कमी असून टि-२० सामन्या प्रमाणे वेगाणे काम करण्याचा सल्ला दिला असल्याने आता सत्कारावर भर न देता सत्कार्यावर भर द्यायचा असल्याचे डॉ. अनिल बोंडे यावेळी म्हणाले.

सत्कारासोहळ्यादरम्यान बोलतांना राज्याचे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे


यावेळी सत्कारासोहळ्यादरम्यान बोलताना डॉ. अनिल बोंडे म्हणाले की, शेतीच्या प्रश्नासोबतच अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठीच्या विषयावर कुठल्याही सूचना असतील, तर माझा ई-मेल आयडीवर किंव्हा व्हाटसअॅपवर तुम्ही पाठवू शकता. डॉ. वसुधा बोंडे या दररोज मालटेकडीवर फिरायला येतात त्यांच्याकडेही सूचना, तक्रारी मांडता येईल असे कृषीमंत्री म्हणले.

सत्कार सोहळ्यादरम्यान डॉ. अनिल बोंडे यांनी एक किस्सा ऐकवला. माजी खासदार अनंत गुढे यांनी माझे आणि डॉ. वसुधाचे लग्न जुळवून आणण्यासाठी माझ्या आईला नागपूरमध्ये गणपती मंदिरांसह सर्व मंदिर फिरवले होते. त्यानंतर होणारी सून दाखवयला नेले होते. हा किस्सा सांगताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटासह सत्कार सोहळ्यात रंगलेल्या हास्य विनोदाचा आनंद लुटला.


संवर्धन समितीच्यावतीने माजी मंत्री यशवंत शेरेकर यांच्या अध्यक्षतेत आयोजित या सोहळ्याला शिवटेकडीवर नियमित फिरायला येणारे माजी खासदर अनंत गुढे, डॉ. अनिल बोंडे यांच्या पत्नी डॉ. वसुधा बोंडे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्रा. कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर, नागरसेवक दिनेश बूब, उद्योजक संजय जाधव, ऍड श्रीकांत खोरगडे माजी नगरसेवक नितीन देशमुख आदी उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचे संचालन राजेश पिदडी यांनी केले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details