महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या; चोवीस तासात दोघेही गजाआड - amravati crime

मंगरूळ दस्तगिर येथील रहिवासी हनुमंत साखरकर हे मागील सहा दिवसांपासून बेपत्ता होते. याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. शोधाशोध सुरू असतानाच गुरुवारी(20फेब्रुवारी) विटाळा गावानजीक असलेल्या वर्धा नदी पात्रात एका पोत्यात त्यांचा मृतदेह सापडला.

amravati murder news
प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या; चोवीस तासात दोघेही गजाआड

By

Published : Feb 22, 2020, 1:58 AM IST

अमरावती -मंगरूळ दस्तगिर येथील रहिवासी हनुमंत साखरकर हे मागील सहा दिवसांपासून बेपत्ता होते. याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. शोधाशोध सुरू असतानाच गुरुवारी (20फेब्रुवारी) विटाळा गावानजीक असलेल्या वर्धा नदी पात्रात एका पोत्यात त्यांचा मृतदेह सापडला. तारेने गळा आवळलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ माजली.

यानंतर तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात हत्येचा कट रचणाऱ्या आरोपी पत्नीला व तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले. 40 वर्षांचे हनुमंत साखरकर हे गेल्या सहा दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात 15 तारखेला नोंदवण्यात आली होती. त्याच अनुषंगाने पोलीस तपास करत असताना विटाळा गावातील पोलीस पाटील यांना एका शेतालगत वाहणाऱ्या नदी पात्रात पोते आढळून आले. यामध्ये तारेने गळा आवळलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संबंधित माहिती कुटुंबीयांना दिली.

पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर मृताच्या पत्नीने स्वत:च्या प्रियकरामार्फत हा हत्येचा कट रचल्याचे उघडकीस आले. पत्नीसह प्रियकरावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details