अमरावती -सगळीकडे बेरोजगारीचे भीषण वास्तव असतांना आपण किती दिवस घरात स्वस्थ बसायचं? बेरोजगारीच्या भस्मासुराने आपल्याला कवेत घ्यायच्या अगोदर आपणच त्यावर मात केली पाहिजे, असे म्हणत 'इच्छा असली तर मार्ग नक्कीच मिळतो, अशी खुणगाठ मनाशी बाळगून अमरावतीच्या बालपणीच्या दोन जिवलग मित्रांनी एकत्र येत भागीदारीमध्ये चहाचा व्यवसाय सुरू केला. अवघ्या आठ महिन्यांतच महिन्याला थोडे थाडके नव्हे तर दीड लाख कमवायला ही ( earned one and a half lakh during competitive exams ) लागले. हे साध्य केले तिशी च्या आतील असलेल्या प्रज्वलित इंगळे आणि आकाश वाहणे या दोन तरुणांनी. 'बासुंदी चहा' या नावाने स्वतः चा ब्रँड तयार ( Basundi tea business of two friends ) केला. आणि हातोहात शहरात चार ठिकाणी फ्रेंचायझी सुद्धा ( Tea business in partnership ) दिली.
दिवसाला विकतात ५०० कप चहा -याच वर्षी जानेवारीत बासुंदी चहा च्या व्यवसायाला सुरुवात( Prepared tea brand While studying ) केली. स्वतः च चहाचा मसाला तयार केला असून त्याचे प्रमाण आम्हीच ठरवल्याचे त्यांनी सांगितले. 10 रुपये प्रति कप याप्रमाणे आज रोजी दिवसाला 400 ते 500 कप एवढा चहा विकला जातो. आजूबाजूच्या सर्व शासकीय कार्यालयात चहा पुरवला जातो. कार्य प्रसंगाच्या ऑर्डर सुद्धा मिळतात.
अशी सुचली कल्पना -बी.ए.ची पदवी घेतल्यानंतर सहा सात वर्ष स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला पण यश मात्र सातत्याने हुलकावणी देत होते. अशातच वय वाढत होते. दोन पैसे कमवण्यासाठी कुटुंबाकडून सातत्याने प्रेशर वाढत होते. नवीन काय करावे अशा विवंचनेत असतानाच बासुंदी चहाची कल्पना सुचल्याचे प्रज्वल इंगळे ने सांगितले. तर मार्केटिंग मध्ये एमबीए करणारा आकाश वाहणे यांनी सांगितले की, मला खाद्यान्न व्यवसायामध्येच काहीतरी करायचे होते. परंतु नेमके काय करावे हे सुचत नव्हते. शेवटी भांडवल हा प्रश्न होताच. अल्प भांडवलात सुरू होणाऱ्या चहा ची कल्पना सुचली आणि आवडली सुद्धा.