महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नुकसान भरपाईच्या यादीत पश्चिम विदर्भ वगळला, माजी कृषी मंत्र्यांची संतप्त प्रतिक्रिया

राज्यात अतिवृष्टीमुळे व पूरपरीस्थिती झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. यामध्ये पश्चिम विदर्भ वगळला गेला आहे. यात पूर्व विदर्भातील नागपूर आणि गडचिरोली या केवळ दोन जिल्हाचा समावेश करण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह राज्याच्या विविध भागांना संततधार पावसाचा जोरदार फटका बसला आहे. मराठवाड्यात तर अक्षरशः पिकांबरोबर शेतकऱ्यांची स्वप्नही या पावसासोबत वाहून गेल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे अशी खंत माजी कृषी मंत्री अनिल बोंडे व्यक्त केली आहे.

माजी कृषी मंत्री अनिल बोंडे
माजी कृषी मंत्री अनिल बोंडे

By

Published : Oct 27, 2021, 12:11 PM IST

अमरावती - ऑगस्ट ते सप्टेंबर मध्ये राज्यात अतिवृष्टीमुळे व पूरपरीस्थिती झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. यामध्ये पश्चिम विदर्भ वगळला गेला आहे. यात पूर्व विदर्भातील नागपूर आणि गडचिरोली या केवळ दोन जिल्हाचा समावेश करण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह राज्याच्या विविध भागांना संततधार पावसाचा जोरदार फटका बसला आहे. मराठवाड्यात तर अक्षरशः पिकांबरोबर शेतकऱ्यांची स्वप्नही या पावसासोबत वाहून गेल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे अशी खंत माजी कृषी मंत्री अनिल बोंडे व्यक्त केली आहे.

माजी कृषी मंत्री अनिल बोंडे

मराठवाड्याबरोबरच पावसाचा फटका पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांना बसला आहे. पश्चिम विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यात मुख्यतः सोयाबीन आणि कपाशीचे उत्पादन घेतले जाते. परंतु, यावर्षीही या पिकांना पावसाचा जबर फटका बसला असल्याने पश्चिम विदर्भातील तब्बल ३ लाख ६६ हजार ३०२ हेक्टरवरील पिके पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या हातून गेली आहेत. नुकसान झालेल्या पिकांमध्ये सर्वाधिक नुकसान सोयाबीनचे झाले असून २ लाख ३८ हजार हेक्टरवरील सोयाबीन मातीमोल झाले आहे. शिवाय १ लाख १ हजार ५५४ वरील कपाशीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता जगावे कसं? असा प्रश्न बळीराजाला पडला आहे. यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर केलीय. यामध्ये मात्र नागपूर व गडचिरोली जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे असही बोंडे म्हणाले आहेत.

पश्चिम विदर्भ नुकसान आकडेवारी प्राथमिक

बुलढाणा जिल्हा

पिके-सोयाबीन, कापूस, तूर, मका, ज्वारी-एकुन नुकसान-1 लाख 25 हजार 693 हेक्टर

अकोला जिल्हा

पिके-सोयाबीन, कापूस, तूर, हळद, उडीद, निम्बु -एकूण नुकसान-46 हजार 773

वाशीम जिल्हा

पिके/सोयाबीन,कापूस,तूर,भजीपला-
एकूण नुकसान-30 हजार 762 हेक्टर

अमरावती जिल्हा

पिके-सोयाबीन, तूर, कापूस -एकूण नुकसान-1लाख 51 हजार 277 हेक्टर

यवतमाळ जिल्हा

पिके-सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, ज्वारी, मका, भाजीपाला -एकूण नुकसान -9 हजार 619 हेक्टर

पश्चिम विदर्भात एकूण नुकसान-3 लाख 64 हजार 25 हेक्टर

पश्चिम विदर्भातील दोन प्रमुख पिके

सोयाबिन नुकसान -2 लाख 38 हजार 302 हेक्टर
कापूस नुकसान-1लाख 1हजार 554 हेक्टर

जिल्हा निहाय नुकसान सोयाबीन व कापूस

बुलढाणा-

सोयाबीन-88 हजार 36 हेक्टर
कापूस-19 हजार 926 हेक्टर

अकोला-
सोयाबीन-33 हजार 947 हेक्टर.
कापूस-7 हजार 734 हेक्टर.

वाशीम-
सोयाबीन-30 हजार 250 हेक्टर
कापूस-481 हेक्टर

अमरावती-
सोयाबीन-83 हजार 393 हेक्टर
कापूस-66 हजार 952 हेक्टर

यवतमाळ-
सोयाबीन-2676 हेक्टर .
कापूस-6461 हेक्टर..

सर्वाधिक नुकसान
1-बुलढाणा.
2-अमरावती.

पश्चिम विदर्भात पेरणी क्षेत्र

सोयाबीन-14 लाख 74 हजार 281 हेक्टर
कापूस-10 लाख 16 हजार 431 हेक्टर

हेही वाचा -आता हा दाढीवाला कोण? नवाब मलिकांचा नवा खुलासा; त्याचा शोध घेण्याचे एनसीबीला आवाहन

ABOUT THE AUTHOR

...view details