अमरावती - यावर्षी कडाक्याच्या उन्हामुळे अमरावती विभागातील जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. विभागातील लघू, मध्यम व मोठ्या अशा 415 प्रकल्पात जेमतेम 36 टक्के जलसाठा उरला असून अमरावती विभागातील बुलडाणा, अकोला या जिल्ह्यातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. हे संकट टळण्यासाठी मान्सूनची प्रतीक्षा केली जात आहे.
अशी आहे प्रकल्पांची स्थिती -अमरावती विभागात एकूण नऊ मोठे प्रकल्प आहेत. यात अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा प्रकल्पात सध्या 48. 73. टक्के जलसाठा असून यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्पात 30. 13, अरुणावती मध्ये 22.90, बेंबळा प्रकल्पात 51. 31 टक्के पाणीसाठा आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात 35.73, आणि वाहन प्रकल्पात 47. 28 टक्के जलसाठा आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा धरणांमध्ये 34. 80 टक्के जलसाठा असून पेनटाकळी प्रकल्पात 42. 42 तर खडकपूर्णा प्रकल्पात 5. 53 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
पंचवीस मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा कमी -विभागात असणाऱ्या पंचवीस मध्यम प्रकल्पांची परिस्थितीसुद्धा अशीच काहीशी आहे. अमरावती शहराच्या शहानूर धरणामध्ये 44 पॉईंट 47 चंद्रभागा धरणामध्ये 53 प. 19 टक्के पूर्णा प्रकल्पात 52.80 टक्के सापन प्रकल्पात 53. 01 पांढरी प्रकल्पात 24.5 टक्के पाणी सध्या घडीला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील आधारपूस धरणात 41.3, सायखेडा प्रकल्पात 57. 87, गोकी प्रकल्पात 45.5 वाघाडी प्रकल्पात 47.5 टक्के चाळीस बोरगाव प्रकल्पात 27.9 बोरगाव मध्ये 37. 73 जलसाठा आहे. अकोला जिल्ह्यातील निरगुडमध्ये 23.8 टक्के बोरला धरणात 38.0 सहा टक्के उमा प्रकल्पात 12.7 टक्के घुंगशि बरेजमध्ये 63. 19 टक्के वाशिम जिल्ह्यातील अडाण प्रकल्पात 33.5 टक्के सोनलमध्ये 38. 71 टक्के एकबुर्जी मध्ये 13.0 तीन टक्के तर बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा प्रकल्पात 1.6 टक्के येथे 13. 38 टक्के, मस येथे 36.4 टक्के कोराडीमध्ये 47. 22 टक्के मन प्रकल्पात 36. 95 टक्के, तोरणा प्रकल्पात 3.4 टक्के ऊनावळी प्रकल्पात 22.1 90 टक्के जलसाठा आहे.
अमरावती जिल्ह्याची परिस्थिती -अमरावती जिल्ह्यातील 47 प्रकल्पात 40. 33 टक्के पाणी साठा असून अप्पर वर्धा प्रकल्प 42.0 तीन टक्के पाणी शिल्लक आहे. शहानूर, चंद्रभागा, पूर्णा, सापन व पांढरी अशा पाच मध्यम प्रकल्पात 36.39 टक्के पाणीसाठा आहे. तर जिल्ह्यात 41 लघु प्रकल्प असून त्यात 26. 95 टक्के पाणी आहे. जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघु प्रकल्प अशा 47 प्रकल्पात सध्या स्थितीत 40.33 टक्के पाणी साठा उपलब्ध आहे.