महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अप्पर वर्धा धरणातील पाणी साठ्यात वाढ; जाम नदीला पूर आल्याने वाढली पाण्याची पातळी - अप्पर वर्धा धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ

गेल्या चार दिवसांपासून मोर्शी तालुक्यातील सालबर्डी व मध्यप्रदेश मधील अनेक भागात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मध्यप्रदेश मधून वाहणाऱ्या जाम नदीला पूर आल्याने अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

पाणी साठ्यात वाढ

By

Published : Aug 9, 2019, 10:49 AM IST

Updated : Aug 9, 2019, 12:06 PM IST

अमरावती - मागील चार दिवसांपासून जिल्ह्यातील मोर्शी, सालबर्डी तालुक्यात तर मध्यप्रदेश मधील अनेक सुरू भागात सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणातील जलसाठ्यात वाढ होत आहे.

अप्पर वर्धा धरणातील पाणी साठ्यात वाढ


गेल्या चार दिवसांपासून मोर्शी तालुक्यातील सालबर्डी व मध्यप्रदेश मधील अनेक भागात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मध्यप्रदेश मधून वाहणाऱ्या जाम नदीला पूर आल्याने अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. सध्या या जलाशयात 33% जलसाठा आहे. पावसाळ्यापूर्वी या धरणात केवळ 10 टक्केच जलसाठा शिल्लक होता. पण हळूहळू या जलसाठ्यात वाढ होत आहे.
जलसाठा वाढत जरी असला तरी मागील वर्षी याच तारखेला या धरणात 45.71% इतका जलसाठा होता. मात्र, मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अद्यापही जलसाठ्यात 12.71 टक्क्यांची तुट आहे.

Last Updated : Aug 9, 2019, 12:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details