अमरावती- जिल्ह्यात रविवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पथ्रोटच्या नाल्याला पूर आला आहे. यावेळी अभियंत्यांच्या चुकीच्या नियोजनामुळे लोकांच्या घरात आणि गावात पाणी शिरल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
अमरावतीच्या पथ्रोटमध्ये पहिल्याच पुरात शिरले गावात पाणी - over flow
अभियंत्यांच्या चुकीच्या नियोजनामूळे लोकांच्या घरात व गावात पाणी शिरल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
पावसाळा सुरू होऊन दोन महिन्याचा अवधी संपत असताना पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामध्ये पहिल्यांदाच पथ्रोटच्या नाला ओसांडून वाहू लागला. गावाच्या मध्यभागातून वाहत असलेला नाला शिंदी रस्त्याच्या समोर पुलाखालून वाहतो. अशावेळी हायवेचे सिमेंट काँक्रिटीकरण रस्ता बनविण्याचे काम सुरू असल्याने या ठिकाणी असलेला हा पुल तोडण्यासाठी हायवेच्या अभियंत्यांनी पुलाला लागूनच परावर्तित मार्ग तयार केला आहे. तो मार्ग तयार करताना मुख्य पुलाच्या पायल्यांचा संख्येचा विचार न करता फक्त दोन पायल्या टाकूनच तयार केले.
दरम्यान सरपंच गोपाळ कावरे यांनी पत्रव्यवहार करून पाण्याचा अंदाज दर्शवून त्यांना पायल्या वाढविण्याचे निर्देश दिले होते. याकडे प्रशासनाने साफ दुर्लक्ष केल्याने सोमवारी आलेले पुराचे पाणी लोकांच्या घरा घरात शिरले. त्यामुळे गावात एकच हाहाकार उडाला. अशावेळी गावातील तरुणांनी एकत्र येऊन परावर्तित मार्ग खोदून काढला व पाण्याला वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न केला