महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावती : धरणात मुबलक साठा असतानाही पाणी नेमके मुरतेय कुठे, नागरिकांमध्ये असंतोष - अमरावती पाणीटंचाई बातमी

सध्या उन्हाळ्यामुळे नागरिकांचे उष्णतेने हाल होत असताना जिल्ह्यातील नागरिकांना शाखा अभियंत्याच्या नियोजनशुन्य कामामुळे कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अंजनगांव व दर्यापूर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या शहानुर धरणात यावर्षी मुबलक पाऊस झाल्यामुळे मुबलक पाणीसाठा आहे. तरीसुध्दा अंजनगांव शहरात व तालुक्यात पाणीटंचाई सदृष्य परिस्थीती निर्माण झाली आहे.

धरणात मुबलक पाणी असतांना सुध्दा कृत्रिम पाणी टंचाई
धरणात मुबलक पाणी असतांना सुध्दा कृत्रिम पाणी टंचाई

By

Published : May 27, 2020, 1:36 PM IST

अमरावती -सध्या उन्हाळा असल्यामुळे सगळीकडे पाणीटंचाई निर्माण होत आहे. कुठे जमिनीतील पाणी कमी होत असते तर कुठे पाणी पुरवठा होणाऱ्या धरणात पाणीसाठा कमी असल्यामुळे पाऊस येईपर्यंत पाणी पुरवावे लागते. परंतु, अंजनगांव व दर्यापूर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या शहानूर धरणात मुबलक पाणीसाठा आहे. तरीसुध्दा अंजनगांव शहरात व तालुक्यात येथील शाखा अभियंत्याच्या नियोजनशुन्य कामामुळे पाणीटंचाई सदृष्य परिस्थीती निर्माण झाली आहे.

शहरातील पाणीटंचाई नैसर्गिक नसून कृत्रिम असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. मा.जि.प्र.म. चा येथील कारभार पाहणारे शाखा अभियंत्याचे पाणी नियोजनावर लक्षच नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. या अभियंत्याला याविषयी गावातील सामाजिक, राजकीय लोकांनी संपर्क केला असता, तो कधी होतो तर, कधी नॉट रिचेबल असतो. संपर्क झाल्यास एक दोन-दिवस सुरळीत पाणी पुरवठा होतो. मात्र, नंतर पाणी वितरण व्यवस्थित होत नाही. याबाबत काही नागरिकांनी विचारणा केली असता, वॉलच्या नादुरुस्तीचे कारण समोर केले जाते. हे वॉल किती दिवस नादुरुस्त राहणार, याकडे अधिकारी का बरं दुर्लक्ष करत आहेत यावर विचारणा केल्यास कंत्राटदाराचे नाव समोर केले जाते.

त्यामुळे, ही पाणीटंचाई नसून अधिकारी व कंत्राटदार यांनी कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केल्याची चर्चा अंजनगांव शहरात आहे. याविषयावर लोकांनी आ‌मदार बळवंत वानखेडे यांना कळविल्यानंतर त्यांनी याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. मात्र, यानंतरही समस्या दोन-तीन दिवसांसाठी दूर होते व नंतर जैसे थे परिस्थिती असते. रमजान ईदसारख्या सणादरम्यानही शहरात पाण्याची टंचाई अंजनगांव शहराला बघण्यास मिळाली असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. ही कृत्रिम पाणीटंचाई प्रशासनाने लवकर दूर करावी. अन्यथा, लोकांचा संयम सुटल्यास मोठे जन आंदोलन उभे राहु शकते असा सूर नागरिकांमधून निघत आहे. जर जनता पाण्यासाठी रस्त्यावर उतरली तर, कोरोनाचा संसर्गा रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनचाही फज्जा ऊडू शकतो अशी चर्चा जोर धरू लागली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details