महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावतीच्या जोशी मार्केटच्या पार्किंगमध्ये तुंबले पाणी - parking

गत 48 तासापासून शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे रस्त्यावर पाणी वाहत आहे. हे पाणी शहराच्या मध्यभागात असणाऱ्या अमरावती महापालिकेच्या जोशी मार्केटच्या कार पार्किंगमध्ये मोठया प्रमाणात वाहून आले आहे.

जोशी मार्केटच्या तळ मजल्यावर असणाऱ्या पार्कींगमध्ये पाणी तुंबल्याचे दृष्य

By

Published : Aug 9, 2019, 6:54 AM IST

अमरावती- शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील पाणी जोशी मार्केटच्या तळ मजल्यावर असणाऱ्या पार्किंगमध्ये शिरले आहे. मोटार पंप लावून पार्किंगमध्ये साचलेल्या पाण्याला बाहेर काढण्यात येत आहे.

जोशी मार्केटच्या तळ मजल्यावर असणाऱ्या पार्कींगमध्ये पाणी तुंबल्याचे दृष्य

गत 48 तासापासून शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे रस्त्यावर पाणी वाहत आहे. हे पाणी शहराच्या मध्यभागात असणाऱ्या अमरावती महापालिकेच्या जोशी मार्केटच्या कार पार्किंगमध्ये मोठया प्रमाणात वाहून आले आहे. या पार्किंगच्या ठिकाणी मार्केटमध्ये असणाऱ्या दुकानांचे विजेचे मीटर लागले असून, या मीटरपर्यंत पाण्याची पातळी पोहोचली आहे. यावेळी मोटार पंपाच्या सहाय्याने पार्किंगमध्ये साचलेल्या पाण्याला बाहेर काढण्यात येत आहे. पाऊस थांबण्याची शक्यता सध्यातरी नसल्याने जोशी मार्केटच्या पार्किंगमध्ये आणखी पाणी सचण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details